सरपंच कन्यारत्न पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 10:06 PM2019-09-02T22:06:19+5:302019-09-02T22:06:55+5:30
सरपंच महादेव बुरडे यांनी मागील वर्षी तान्हा पोळ्याच्या दिवशी जानेवारी २०१९ पासून गावात जन्माला येणाऱ्या कन्यारत्नांचा सन्मान करून पुरस्कार वितरण करण्याची घोषणा केली होती. ती घोषणा त्यांनी यावर्षी तान्हा पोळ्या दिवशी पूर्ण केली. तान्हा पोळ्याच्या दिवशी संपूर्ण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरपंचाचे हस्ते नंदीची पूजा करण्याची गावची परंपरा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : पालोरा येथे तान्हा पोळ्याच्या दिवसी हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत सरपंच महादेव बुरडे यांनी घोषित केलेल्या सरपंच कन्यारत्न पुरस्काराचे वितरण थाटात करण्यात आले. यानिमित्ताने मान्यवरांचे हस्ते पारितोषिकांचे वाटप करण्यात आले.
सरपंच महादेव बुरडे यांनी मागील वर्षी तान्हा पोळ्याच्या दिवशी जानेवारी २०१९ पासून गावात जन्माला येणाऱ्या कन्यारत्नांचा सन्मान करून पुरस्कार वितरण करण्याची घोषणा केली होती. ती घोषणा त्यांनी यावर्षी तान्हा पोळ्या दिवशी पूर्ण केली. तान्हा पोळ्याच्या दिवशी संपूर्ण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरपंचाचे हस्ते नंदीची पूजा करण्याची गावची परंपरा आहे. ती परंपरा पाळल्यानंतर सरपंच मानधनातून दिल्या जाणाऱ्या पुरस्कार कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सैनिक कैलास बुरडे, सरपंच महादेव बुरडे, उपसरपंच साकेश चिचगावकर, तंमुस अध्यक्ष मनोहर रोटके, ग्रा.पं. सदस्य भोजराम तिजारे, रोशन कढव, मंगेश डोमळे, मनिषा बुरडे, सुषमा मेश्राम, रसिका धांडे, शिल्पा आराम, हाडगे, काशिनाथ ढोमणे, भैय्या कनोजकर, चंद्रदिन आराम, रविंद्र तिजारे, दुर्गादास वनवे, रविंद्र ठवकर, प्रकाश भोयर, रमेश ठवकर, बळीराम अतकरी, अमरकंठ धांडे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.