जिल्ह्यातील ३० नमुने निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:00 AM2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:17+5:30
जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना मिशन मोडवर निरंतर करण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन असून सोशल डिस्टन्सिंगचे कठोरपणे पालन केले जात आहे. रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात असून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातून आतापर्यंत नागपूर मेयो रुग्णालयात तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांपैकी ३० नमुने निगेटिव्ह आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात सुदैवाने अद्यापपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून नागपूर येथे पाठविलेल्या घश्यातील नमुन्यांपैकी ३० नमुने निगेटिव्ह आले आहेत. २४ व्यक्ती हॉस्पीटल क्वारंटाईन असून आतापर्यंत १८ जणांना सुटी देण्यात आली आहे. तर आठ व्यक्ती आयसोलेशन वॉर्डात दाखल आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना मिशन मोडवर निरंतर करण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन असून सोशल डिस्टन्सिंगचे कठोरपणे पालन केले जात आहे. रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात असून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातून आतापर्यंत नागपूर मेयो रुग्णालयात तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांपैकी ३० नमुने निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी २३ व्यक्तींचे घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्याचा अद्याप अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
मुंबई, पुण्यासह महानगरातून १ मार्च ते १ एप्रिलपर्यंत ११ हजार ४९३ व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाले आहे. त्या सर्वांनी जलद प्रतिसाद चमुने भेट देवून तपासणी केली. सध्या ११ हजार ५३० व्यक्ती होम क्वारंटाईन असून त्यात परदेशातून आलेल्या २२ व्यक्तींचा समावेश आहे. नर्सिंग वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात सध्या २४ जण दाखल आहेत. तर आतापर्यंत तेथून १८ जणांना सुटी देण्यात आली. आयसोलेशन वॉर्डात आठ जणांना दाखल करण्यात आले आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगद्वारे उपचार केले जात असून आशा सेविका घरोघरी जावून सर्वेक्षण करीत आहे. जिल्ह्यात कुठेही कोरोनाचा रुग्णा आढळून आला नसला तरी प्रभावी उपाययोजना केल्या जात आहे.
स्वत:हून माहिती देण्याचे आवाहन
दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झालेले दोन व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्या दोघांच्या घश्यातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या दोघांपैकी एकाला आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. मरकजमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी स्वत:हून माहिती देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.