जिल्ह्यात ५२ काेराेनामुक्त, ३४ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:29 AM2021-01-04T04:29:33+5:302021-01-04T04:29:33+5:30
जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असून, बरे हाेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९४.७८ टक्के, ...
जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असून, बरे हाेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९४.७८ टक्के, तर मृत्यू दर केवळ २.३५ टक्के आहे. अलीकडे मृतांची संख्या ही कमी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात जिल्हा काेराेनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या काेणत्याही तापाच्या रुग्णाची काेविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
बाॅक्स
तपासणीच्या तुलनेत ११.७ टक्के पाॅझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत तपासणी झालेल्या व्यक्तीच्या तुलनेत ११.७ टक्के व्यक्ती काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत एक लाख ६ हजार १८२ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले हाेते. त्यात १२ हजार ४७६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या. त्याची टक्केवारी ११.७ आहे. सप्टेंबर महिन्यात हीच टक्केवारी १४.८ टक्क्यांपर्यंत पाेहाेचली हाेती, तर जानेवारी महिन्यात तीन दिवसांत १२१ रुग्ण आढळून आले आहेत.