जिल्हा पुन्हा काेराेनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:40 AM2021-08-12T04:40:17+5:302021-08-12T04:40:17+5:30

भंडारा जिल्हा शुक्रवारी काेराेनामुक्त झाला हाेता. राज्यात सर्वप्रथम काेराेनामुक्त हाेण्याचा मानही मिळाला हाेता. मात्र चारच दिवसानंतर पुन्हा एका रुग्णाची ...

The district is again free of carnage | जिल्हा पुन्हा काेराेनामुक्त

जिल्हा पुन्हा काेराेनामुक्त

Next

भंडारा जिल्हा शुक्रवारी काेराेनामुक्त झाला हाेता. राज्यात सर्वप्रथम काेराेनामुक्त हाेण्याचा मानही मिळाला हाेता. मात्र चारच दिवसानंतर पुन्हा एका रुग्णाची साेमवारी भर पडली. त्यामुळे जिल्हा काेराेनाग्रस्तांच्या यादीत आला. आराेग्य यंत्रणेसह नागरिकही गाेंधळून गेले हाेते. मात्र दुसऱ्याच दिवशी मंगळवारी हा रुग्ण काेराेनामुक्त हाेऊन घरी गेला. एका दिवसात काेराेनामुक्त झालेल्या रुग्णाबाबत आराेग्य विभागाशी संपर्क साधला असता त्या व्यक्तीचा स्वॅब ३१ जुलै राेजी घेतला हाेता. परंतु त्याचा अहवालच प्राप्त झाला नव्हता. साेमवारी त्याचा अहवाल प्राप्त हाेऊन त्यात ताे पाॅझिटिव्ह आढळून आला हाेता. परंतु ताेपर्यंत त्याच्यावर याेग्य उपचार झाल्याने ताे मंगळवारी काेराेनामुक्त झाला आणि भंडारा जिल्हा पुन्हा काेराेनामुक्त जिल्ह्याच्या यादीत अग्रक्रमावर आला.

बाॅक्स

४६७ व्यक्तींची तपासणी पाॅझिटिव्ह शून्य

मंगळवारी ४६७ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात कुठेही काेराेना पाॅझिटिव्ह व्यक्ती आढळून आला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ५८ हजार ८१० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून त्यापैकी ५८ हजार ६७७ व्यक्तींनी काेराेनावर मात केली तर १,१३३ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला.

Web Title: The district is again free of carnage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.