जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 09:20 PM2018-10-17T21:20:35+5:302018-10-17T21:21:04+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बँक आहे. शेतकऱ्यांच्या सुविधांकरिता पुढाकार घेवून एटीएम सुरू केले आहे. डिजिटलच्या जमान्यात आमचा शेतकरी तंत्रज्ञान शिकला पाहिजे, वेळेची बचत करण्यासाठी शेतकऱ्यांनी एटीएम सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनोहरभाई पटेल अकॅडमेच्या अध्यक्षा वर्षाताई पटेल यांनी सानगडी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बँक आहे. शेतकऱ्यांच्या सुविधांकरिता पुढाकार घेवून एटीएम सुरू केले आहे. डिजिटलच्या जमान्यात आमचा शेतकरी तंत्रज्ञान शिकला पाहिजे, वेळेची बचत करण्यासाठी शेतकऱ्यांनी एटीएम सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनोहरभाई पटेल अकॅडमेच्या अध्यक्षा वर्षाताई पटेल यांनी सानगडी येथे केले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सानगडी शाखेत एटीएमच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून धनपाल उंदिरवाडे, सरीता फुंडे, उषा करपते, जनार्धन डोंगरवार, अशोक लिचडे उपस्थित होते. यावेळी बोलताना वर्षाताई पटेल म्हणाल्या, भाजप सरकार हे फसवेगिरांचे सरकार असून मोठ मोठ्या आश्वासनांची वल्गना करून अक्षश: सामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
अशा सरकारला धडा शिकविण्यासाठी महिलांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना सुनील फुंडे म्हणाले, बँक शेतकऱ्यांकरिता व ग्राहकांकरिता नेहमीच सकारात्मक भूमिका घेते.
ग्रामीण शाखांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेवून प्रत्येक शाखेत एटीएम सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
नवरात्रीच्या उत्सवात ११ एटीएम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संचालन अनिल टेंभरे यांनी केले.
दिघोरीत एटीएम सेवा
दिघोरी (मोठी) : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दिघोरी शाखेत एटीएम केंद्राचे उद्घाटन वर्षाताई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. आता शेतकºयांना तात्काळ पैसे मिळणार आहे. यासाठी सरपंच अरुण गभणे यांनी वारंवार पाठपुरावा केला. उद्घाटन प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, संचालक सदाशिव वलथरे, जिल्हा परिषद सदस्य माधुरी हुकरे, पंचायत समिती सदस्य गुलाब कापसे, बंडू येरणे, हंसराज रामटेके, अविनाश ब्राम्हणकर, नरेश दिवठे, माजी सरपंच शंकरराव खराबे, सोपान भेंडारकर, हिरामण देशमुख उपस्थित होते. संचालन दिपक चिमनकर यांनी केले.