जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना १५ एप्रिलपासून नवीन पीक कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 04:00 AM2020-04-03T04:00:00+5:302020-04-03T04:00:02+5:30
कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. अशा स्थितीतही अनेक शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केली आहे. आता कर्ज परतफेडीस मुदत वाढ मिळाली आहे. ३१ मार्चपर्यंत कर्ज भरणाºया शेतकºयांना नविन पीक कर्ज देण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध सहकारी संस्थानी ३१ मार्चपर्यंतच्या जमाखर्चाचे ताळेबंद हिशेब १० एप्रिलपर्यंत बँकेच्या मुख्यालयी पाठविण्याचे निर्देश दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पीक कर्जाच्या परताव्यास मुदत वाढ मिळाली असून ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १५ एप्रिलपासून नवीन पीक कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली.
कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. अशा स्थितीतही अनेक शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केली आहे. आता कर्ज परतफेडीस मुदत वाढ मिळाली आहे. ३१ मार्चपर्यंत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना नविन पीक कर्ज देण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध सहकारी संस्थानी ३१ मार्चपर्यंतच्या जमाखर्चाचे ताळेबंद हिशेब १० एप्रिलपर्यंत बँकेच्या मुख्यालयी पाठविण्याचे निर्देश दिले आहे. त्यावरुन तातडीने नवीन पीक कर्ज वितरण करण्यात येईल असे सुनील फुंडे यांनी सांगितले. मात्र उशिराने ताळेबंद पाठविल्यास त्या संस्थाना रकमेचे वाटप उशिरा होईल. शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागेल. त्यासाठी संस्थाध्यक्ष व सचिवांनी वेळेत आपला ताळेबंद सादर करावा, असे आवाहन फुंडे यांनी केले.
लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून त्याला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बँक विविध उपाययोजना करीत आहे. नवीन पीक कर्ज वाटपाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
संचारबंदीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतात काम करायला मजूर मिळत नाही. शेतीमाल विकायला कुठे जावे असा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी धावून आली.