जिल्हा बँकेतर्फे २९२ कोटी ५३ लाखांचे पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:24 AM2021-06-20T04:24:11+5:302021-06-20T04:24:11+5:30

खरीप हंगाम २०२१-२२ साठी जिल्हा बँकेला २८० कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ...

District Bank provides peak loan of Rs. 292.53 crore | जिल्हा बँकेतर्फे २९२ कोटी ५३ लाखांचे पीककर्ज

जिल्हा बँकेतर्फे २९२ कोटी ५३ लाखांचे पीककर्ज

Next

खरीप हंगाम २०२१-२२ साठी जिल्हा बँकेला २८० कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १५ एप्रिलपासून कर्जवाटपाला सुरुवात झाली. १८ जूनपर्यंत २९२ कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले असून १०४ टक्के कर्ज वितरीत केले आहे. राष्ट्रीयकृत बँका एकीकडे शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असताना जिल्हा बँकेने मात्र आपले उद्दिष्ट पूर्ण करून कोरोना संकटात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. जून महिन्याच्या अखेरीस ३०० कोटींच्या वर पीककर्ज वाटप करण्यात येईल, असा विश्वास जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी व्यक्त केला आहे.

पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही. अशा शेतकरी सभासदांना थेट कर्ज दिला जाईल. कुठलाही शेतकरी कर्जासाठी सावकाराच्या दारात जाणार नाही याची दक्षता घेऊ.

-सुनील फुंडे, अध्यक्ष जिल्हा बँक

Web Title: District Bank provides peak loan of Rs. 292.53 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.