जिल्ह्याला मिळाले धान चुकाऱ्याचे १७० काेटी ७७ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:00 AM2021-05-05T05:00:00+5:302021-05-05T05:00:56+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत ३७ लाख ५१ हजार २९० क्विंटल धानाची खरेदी आधारभूत केंद्रावर करण्यात आली. ७०० काेटी ७४ लाख १० हजार ३५५ रुपये त्याची किंमत आहे. त्यापैकी ५२९ काेटी ९३ लाख ८४ हजार १३२ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले हाेते. मात्र १७० काेटी ८० लाख २६ हजार २२२ रुपयांचे चुकाने थकीत हाेते. गत तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नाही.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गत तीन महिन्यांपासून धान चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने जिल्ह्याला धानाचे १७० काेटी ७७ लाख ९० हजार रुपये प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे जमा हाेण्यास प्रारंभ झाला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधारभूत खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली हाेती. मात्र, गत तीन महिन्यांपासून धानाच चुकारे मिळत नव्हते. त्यामुळे काेराेना संकटात शेतकऱ्यांची माेठी काेंडी हाेत हाेती. ही बाब माजी आमदार राजेंद्र जैन व आमदार मनाेहर चंद्रीकापुरे यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी २७ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासाेबत चर्चा केली.
थकीत चुकाराचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यावेळी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्याचीच पूर्तता करीन शासनाचे भंडारा जिल्ह्यातील धान चुकाऱ्याचे १७० काेटी ७७ लाख ९० हजार रुपये जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त झाले. परिणामी शेतकऱ्यांची समस्या दूर झाली. शेतकऱ्यांना चुकारे मिळण्यास प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांनी खासदार प्रफुल पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार माेहन चंद्रीकापुरे यांचे आभार मानले.
जिल्ह्यात आतापर्यंत ३७ लाख ५१ हजार २९० क्विंटल धानाची खरेदी आधारभूत केंद्रावर करण्यात आली. ७०० काेटी ७४ लाख १० हजार ३५५ रुपये त्याची किंमत आहे. त्यापैकी ५२९ काेटी ९३ लाख ८४ हजार १३२ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले हाेते. मात्र १७० काेटी ८० लाख २६ हजार २२२ रुपयांचे चुकाने थकीत हाेते. गत तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले हाेते. ही बाब लक्षात येताच खासदार पटेल यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन चुकाऱ्याचा प्रश्न साेडविला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच बाेनसची रक्कमही मिळणार आहे. मात्र उन्हाळी धान खरेदीचा प्रश्न आता पुन्हा उभा ठाकला आहे.
बाेनसची रक्कम लवकरच येणार
शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपयेप्रमाणे ५० क्विंटलपर्यंत बाेनस देण्याची घाेषणा महाविकास आघाडी सरकारने दिली हाेती; परंतु धान विक्री करून पाच महिन्यांचा कालावधी लाेटला तरी ही रक्कम प्राप्त झाली नाही. यासंदर्भात खासदार प्रफुल पटेल यांनी चर्चा केली असून लवकरच बाेनसची रक्कम मिळणार असल्याचे सांगितले.