जिल्ह्यात ८२ कर्करूग्ण
By admin | Published: February 4, 2017 12:19 AM2017-02-04T00:19:20+5:302017-02-04T00:19:20+5:30
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कर्करोगावर नियंत्रण घालण्याकरिता जगजागरण करण्यात येत आहे.
आज जागतिक कर्करोग दिन
भंडारा : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कर्करोगावर नियंत्रण घालण्याकरिता जगजागरण करण्यात येत आहे. असे असले तरी, एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात जिल्हा सामान्य रूग्णालयात तपासणीअंती कर्करोगाचे ८२ रूग्ण आढळले आहेत. दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो.
सन २०१४-१५ या वर्षात संशयीत रूग्णांची तपासणी करण्यात आली होती. यात १५१ जणांना कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. कर्करोग बाधितांमध्ये २२ रूग्णांना तोंडाचा आजार, २५ जणांना मानेचा आजार, ४० जणांना स्तनाचा आजार तर ६४ जणांना अन्य आजाराने ग्रासले होते. यावर्षी एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात संशयीत रूग्णांवर उपचार करण्यात आले. यापैकी ८२ रूग्णांना कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले. यातील २५ जणांना तोंडाचा आजार, ५ जणांना मानेचा कर्करोग, १९ जणांना स्तनाचा कर्करोग तर ३३ जणांना शरीराच्या अन्य भागावर कर्करोगाने बाधित केले. कर्करोगासंबंधी जनजागृतीच्या कार्यक्रमात अडचणी येतात. आरोग्यदायी वर्तणूक, कर्करोगाची लक्षणे आढळल्यास आरोग्य संस्थेत जाऊन निदान करून घेणे आदिबाबत जागरूकता नाही. त्यामुळे अनेकजण वंचित राहत आहे. कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूपैकी जवळपास ३० टक्के मृत्यूला तंबाखू कारणीभूत आहे. रूग्णांच्या निदानासाठी आरोग्य विभागातर्फे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कर्करोगावर आळा घालण्याकरिता जनजागरण तसेच निदान व उपचार करण्यात येते.
- डॉ.किशोर चाचेरकर,
निवासी वैद्यकिय अधिकारी, बाह्यसंपर्क सामान्य रूग्णालय भंडारा