जिल्ह्यात आतापर्यंत ६१२.४ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:33 AM2021-08-01T04:33:06+5:302021-08-01T04:33:06+5:30
जिल्ह्यात यावर्षी पावसाने शेतकऱ्यांची निराशा केल्याचे दिसत आहे. दरवर्षी जुलै महिन्यात दमदार पाऊस कोसळतो. परंतु मध्यंतरी तीन आठवडे पावसाने ...
जिल्ह्यात यावर्षी पावसाने शेतकऱ्यांची निराशा केल्याचे दिसत आहे. दरवर्षी जुलै महिन्यात दमदार पाऊस कोसळतो. परंतु मध्यंतरी तीन आठवडे पावसाने दडी मारली होती. गत चार दिवसांपासून रिमझीम पाऊस बरसत आहे. असे असले तरी जिल्ह्यात आतापर्यंत ६१२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यात सरासरी ६३८.८ मिमी पाऊस अपेक्षित असतो. आतापर्यंत ६१२.४ म्हणजे सरासरीच्या ९६ टक्के पाऊस झाला आहे.
गत २४ तासात जिल्ह्यात ४०.८ मिमी पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस लाखनी तालुक्यात ८४.२ मिमी झाला आहे. त्या खालोखाल साकोली ६० मिमी, मोहाडी ३० मिमी, भंडारा ३१.२ मिमी, तुमसर १९.२ मिमी, लाखांदूर २४.४ मिमी पाऊस कोसळला आहे. गत दोन दिवसापासून पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. यामुळे रोवणीला वेग आला आहे.
बाॅक्स
गोसे धरणाचे १५ दरवाजे उघडले
पवनी तालुक्यातील गोसे प्रकल्पातील पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी गत आठ दिवसापासून प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येत आहेत. शुक्रवारी १९ दरवाजे उघडण्यात आले होते. दरम्यान शनिवारी चार दरवाजे बंद करण्यात आले. आता १५ दरवाजे अर्धा मीटरने उघडे असून त्यातून १६२६.५७ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.