जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:34 AM2021-09-13T04:34:30+5:302021-09-13T04:34:30+5:30
आतापर्यंत जिल्ह्यात ६० हजार ८५ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ५८ हजार ९५१ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात ...
आतापर्यंत जिल्ह्यात ६० हजार ८५ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ५८ हजार ९५१ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के असून मृत्युदर ०१.८९ असा आहे. रविवारी ५१७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली तर आतापर्यंत जिल्ह्यात ४ लक्ष ५३ हजार ३२४ जणांची चाचणी करण्यात आली आहे. कोरोनावर लस हाच एकमेव प्रभावी उपाय असून पहिला डोस घेतलेल्यांनी नियमाप्रमाणे दुसरा डोस आवर्जून घ्यावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात गत दीड वर्षात ११३३ जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी सर्वाधिक मृत्यूची नोंद भंडारा तालुक्यात करण्यात आली होती. यात भंडारा तालुक्यात ५१८, मोहाडी ९८, तुमसर १२९, पवनी ११२, लाखनी ९९, साकोली १०६ तर लाखांदुर तालुक्यातील ७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत भंडारा तालुक्यात एकच रुग्ण सक्रिय आहे.
६,८३,१७२ जणांनी घेतला पहिला डोस
जिल्ह्यात आतापर्यंत ८ लक्ष ७६ हजार ११० नागरिकांनी कोविड लस घेतली आहे. यापैकी पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ६ लक्ष ८३ हजार १७२ इतकी आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १ लक्ष ९२ हजार ९३८ इतकी आहे. यापैकी कोविशिल्ड घेतलेल्या नागरिकांची संख्या ४ लक्ष ९३ हजार ७४४ तर कोव्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांची संख्या ३ लक्ष ८२ हजार ३६६ इतकी आहे.