जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:24 AM2021-07-11T04:24:07+5:302021-07-11T04:24:07+5:30
भंडारा : तीन महिन्यांपूर्वी कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना, हळूहळू का होईना भंडारा जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे होत आहे. ...
भंडारा : तीन महिन्यांपूर्वी कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना, हळूहळू का होईना भंडारा जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे होत आहे. शनिवारी पुन्हा एकदा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. तसेच जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या केवळ ९ इतकी आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ५९ हजार ४९२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात शनिवारी ८८० रुग्णांच्या घरच्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. शनिवारी सहा रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत ५८ हजार ३५३ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ४ लक्ष २० हजार १८८ कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी भंडारा तालुक्यात २४ हजार ६४०, मोहाडी तालुक्यात ४,३६७, तुमसर तालुक्यात ७ हजार १३६, पवनी ६०२५, लाखनी ६५६०, साकोली तालुक्यात ७ हजार ६९८, तर लाखांदूर तालुक्यात २९६० रुग्ण बाधित आढळले होते. शनिवारी कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे ११३० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यातील दगावले आहेत.
बॉक्स
जिल्ह्याच्या मृत्यूदर १.९० टक्के
आजघडीला जिल्ह्यात फक्त नऊ रुग्ण सक्रिय आहेत. यात भंडारा तालुक्यात दोन, तुमसर व पवनी तालुक्यात प्रत्येकी एक, लाखनी तालुक्यात दोन, तर साकोली तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर १.९० टक्के इतका आहे.