जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन
By admin | Published: September 15, 2015 12:38 AM2015-09-15T00:38:12+5:302015-09-15T00:38:12+5:30
केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांनी विज्ञान शिक्षण व संशोधन संबंधीचा व शालेय विद्यार्थ्यांकरिता...
भंडारा : केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांनी विज्ञान शिक्षण व संशोधन संबंधीचा व शालेय विद्यार्थ्यांकरिता महत्वकांक्षी कार्यक्रम पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी (इन्स्फायर अवॉर्ड) आजपासून सुरू होत आहे.
शिक्षण विभाग जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनीचे १५ सप्टेंबरला भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम परिसर, महर्षि विद्या मंदिर, उमरी बेला येथे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय इस्फायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन दुपारी २ ला खा. नाना पटोले यांचे हस्ते होईल.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आ. रामचंद्र अवसरे, आ. चरण वाघमारे, आ. बाळा काशीवार, मुख्य कार्यपालन अधिकारी आर.व्ही. निंबाळकर, राजेश डोंगरे, सभापती विनायक बुरडे, नरेश डहारे, निलकंठ टेकाम, शुभांगी रहांगडाले यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी किसन शेंडे, प्राचार्य श्रृती ओहळे, महर्षि विद्या मंदिर भंडारा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)