गौरव पुरस्कार योजनेची जिल्हास्तरीय निवड समिती बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:43 PM2017-11-01T23:43:01+5:302017-11-01T23:43:17+5:30

आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार योजनेची जिल्हास्तरीय निवड समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

District level selection committee meeting of Gaurav Prasar Yojna | गौरव पुरस्कार योजनेची जिल्हास्तरीय निवड समिती बैठक

गौरव पुरस्कार योजनेची जिल्हास्तरीय निवड समिती बैठक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार योजनेची जिल्हास्तरीय निवड समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी आरोग्य सभापती विनायक बुरडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रविशेखर धकाते, वैद्यकीय संघटनाचे अध्यक्ष डॉ. पुनम बावनकर, अशासकीय संस्था प्रतिनिधी डॉ. सुलभा मस्के, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सदानंद मोहतूरे, पत्रकार प्रतिनिधी सुरेश कोटगले, उपस्थित होते.
यावळी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आरोग्य विभागाने डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार योजना सुरु केली असून शासकीय तथा अशासकीय आरोग्य संस्था, शासकीय डॉक्टर, शासकीय महिला डॉक्टर व खाजगी डॉक्टर यांना भरीव आरोग्यसेवेसाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहे. १० नोव्हेंबर पर्यंत खाजगी संस्थांकडून व वैयक्तिक खाजगी डॉक्टर यांचे कडून पुरस्कार मागविण्यात येत आहेत. विशेषत: वैयक्तिक पुरस्कारासाठी अशासकीय डॉक्टर, अशासकीय महिला डॉक्टर शासकीय डॉक्टर व शासकीय महिला डॉक्टर, खाजगी संस्था यांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी केले आहे.
शासकीय डॉक्टर व महिला डॉक्टरांसाठी पुरस्कारासाठी पात्रता झ्र किमान १० वर्षे अखंड शासकीय सेवा, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमातील सहभाग, संस्था व रुग्णालय यांच्या कामामध्ये उल्लेखनीय सहभाग, संस्थेतील व रुगणालयीन तांत्रिक कागदपत्रांची व नोंदवहयांची पूर्तता व एमसीटीएस औषधी सॉफ्टवेअर पुर्तता, संस्थेतील प्रशासकीय कागदपत्रांची व नोंदवहयांची पुर्तता, जनता सहकारी यांच्याशी संबंध, कुटूंब कल्याण शस्त्रक्रियांच्या बाबतीत मृत्युचे प्रमाण नसणे, कामाबाबत तक्रारी नसणे, दोन अपत्यानंतर विशेषत: एक किंवा दोन मुलीनंतर केलेल्या शस्त्रक्रियांचे प्रमाण व केलेल्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, दवाखान्यात झालेल्या प्रसूतीचे प्रमाण, प्रसूतीशी निगडीत तातडीच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण, अर्भक मृत्यु कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न, क्षार संजीवनीद्वारे अतिसाराच्या रुग्णांवर केलेले उपचाराचे प्रमाण, अत्यवस्थ रुगणाला आपल्याच संस्थेत उपचार देऊन बरे केलेले प्रमाण, अत्यावस्थ रुग्णाला आपल्याच संस्थेत उपचार देवून बरे केलेले प्रमाण, संदर्भ सेवेसाठी पाठविलेल्या अत्यवस्थ माता व बालकाचे प्रमाण, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आर.सी.एच. संबंधी सादर केलेले शोधनिबंध, विविध प्रसार माध्यमाद्वारे प्रसिध्द कलेले आरसीएच संबंधी लेख, आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने घेतलेले विशेष उपक्रम व आरोगय शिबीराचे आयोजन, विविध प्रशिक्षणातील सहभाग, राष्ट्रीय आरोगय कार्यक्रम संवर्धनात लोकसहभाग वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, नाविन्यपूर्ण व कल्पक उपक्रमाची अंमलबजावणी, कायापालट कार्यक्रमातील सहभाग, संस्थेसाठी लोकसहभाग, देणगीमधून सूधारणा, आदी कार्यास अधिक प्राधान्य देण्यात येईल.
बैठकीचे संचालन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधूरी माथुरकर तर आभार जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी भगवान मस्के यांनी मानले.

Web Title: District level selection committee meeting of Gaurav Prasar Yojna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.