जिल्ह्यात एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:33 PM2019-07-22T23:33:12+5:302019-07-22T23:33:36+5:30

सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धान रोवणी ठप्प झाली आहे. एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रापैकी ेआतापर्यंत केवळ १३ हजार १० हेक्टरवर आतापर्यंत धानाची रोवणी करण्यात आली. एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली आहे. ही रोवणीही धोक्यात आली असून आता पाऊस आला तरी पऱ्हे कामात येणार नाहीत. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आपली जमीन पडीत ठेवण्याची वेळ आली आहे.

In the district, one lakh 70 thousand hectares of seedlings were laid | जिल्ह्यात एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली

जिल्ह्यात एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली

googlenewsNext
ठळक मुद्देअपुऱ्या पावसाचा फटका : सात टक्के क्षेत्रात झालेली रोवणीही धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धान रोवणी ठप्प झाली आहे. एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रापैकी ेआतापर्यंत केवळ १३ हजार १० हेक्टरवर आतापर्यंत धानाची रोवणी करण्यात आली. एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली आहे. ही रोवणीही धोक्यात आली असून आता पाऊस आला तरी पऱ्हे कामात येणार नाहीत. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आपली जमीन पडीत ठेवण्याची वेळ आली आहे.
भंडारा जिल्ह्यात खरीपाचे लागवड लायक क्षेत्रफळ दोन लाख चार हजार ९५२ हेक्टर आहे. सर्वाधिक एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. यासोबतच तूर, मुंग, उळीद, तिळ, सोयाबीन आणि ऊसाचे पिकही घेतले जाते. भंडारा हा भात उत्पादक जिल्हा या पिकासाठी पावसाची मोठी आवश्यकता असते. परंतु सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिला आहे. रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्रा नक्षत्रात झालेल्या पावसात शेतकºयांनी आपल्या शेतात पºहे टाकले. पºहे लावडलायक होत नाही तोच पावसाने पुन्हा दडी मारली. गत तीन आठवड्यापासून तर पावसाचा पत्ता नाही. या कालावधीत सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकºयांनी रोवणी केली. २० जुलैपर्यंत जिल्ह्यात १३ हजार १० हेक्टरवर रोवणी आटोपली होती. ती धान क्षेत्राच्या केवळ ७.१७ टक्के आहे.
शेतात पºहे लागवडलायक झाले आहेत. पावसाचा पत्ता नाही. पºहे वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. टँकर लावून पºहे वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात मोठा आर्थिक फटका शेतकºयांना बसत आहे. आता पाऊस आला तरी पºहे रोवणीच्या कामी येण्याची शक्यता नाही. त्यामुळे यंदा शेतकºयांची जमीन पडीत राहण्याची भिती आहे.
मूग व उळीद पेरणीला प्रारंभच नाही
जिल्ह्यात उळीद आणि मूगाचे पीक धानपिकासोबत घेतले जाते. परंतु यावर्षी अद्यापही या दोनही पिकाची लागवडच झाली नाही. तिळाच्या ५२४ हेक्टरपैकी ५५ हेक्टरवर लागत झाली आहे.
तूर उत्तम, सोयाबीन धोक्यात
गत काही वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातील शेतकरी तूर आणि सोयाबीनकडे वळले आहे. जिल्ह्यात यंदा तुरीचे निर्धारित क्षेत्र ११ हजार ७४ हेक्टर आहे. कृषी विभागानुसार २० जुलैपर्यंत सात हजार ५७५ हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली. तर सोयाबीनचे क्षेत्र आठ हजार ११९ हेक्टर असून आतापर्यंत २२१ हेक्टरवर लागवड झाली आहे. सध्यस्थितीत तुरीची स्थिती उत्तम असली तरी सोयाबीन मात्र धोक्यात दिसत आहे.

Web Title: In the district, one lakh 70 thousand hectares of seedlings were laid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.