जिल्हा पोलीस दलाची दारु व जुगार अड्ड्यांविरुद्ध मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 05:00 AM2020-11-26T05:00:00+5:302020-11-26T05:00:34+5:30

भंडारा जिल्हा पोलीस दलाची सुत्रे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी हाती घेतली आणि अवैध धंद्याविरुद्ध धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण आणि संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी गत महिनाभरापासून धाडसत्र सुरु केले आहे.

District Police Force's campaign against liquor and gambling dens | जिल्हा पोलीस दलाची दारु व जुगार अड्ड्यांविरुद्ध मोहीम

जिल्हा पोलीस दलाची दारु व जुगार अड्ड्यांविरुद्ध मोहीम

Next
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेचा पुढाकार

  लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटण करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली असून गत महिनाभरापासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी दारु व जुगार अड्यांवर धाडी टाकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या मदतीने जिल्हाभर मोहीम सुरु आहे. यामुळे अवैध व्यवसायीकांचे धाबे दणाणले आहेत.
भंडारा जिल्हा पोलीस दलाची सुत्रे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी हाती घेतली आणि अवैध धंद्याविरुद्ध धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण आणि संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी गत महिनाभरापासून धाडसत्र सुरु केले आहे. साकोली, वरठी, सिहोरा, करडी, जवाहरनगर, आंधळगाव, मोहाडी, पवनी, दिघोरी, लाखांदूर, कारधा, अड्ड्याळ, बरवाही यासह सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाडी टाकण्यात येत आहे. सिहोरा आणि गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दिवस आड धाडी टाकून अवैध धंद्यांचा बिमोड केला जात आहे. 
बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेने वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनुली नाल्यावर धाड टाकली. त्या ठिकाणी हातभट्टी उध्वस्त करण्यात आली. आरोपी विमलाकर किसन लोणारे रा.वरठी याच्या ताब्यातुन ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यासोबत साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकोडी परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारु गाळली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरुन एकोडी येथे धाड मारली असता आरोपी गुरुचरण तुलाराम उके रा.एकोडी याच्याजवळून दारु गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी दारु विरुद्ध मोहीम सुरु असल्याने हातभट्टी दारु काढणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.  
साकोलीत सट्टापट्टीवर धाड 
भंडारा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी साकोली येथील एका सट्टापट्टीवर धाड मारुन दोघांना अटक केली. ताराचंद बकाराम राहुले रा.आंबेडकर वाॅर्ड सावरबंध आणि कैलाश खांडेकर रा.साकोली अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याजवळून राजधानी, कुबेर मटक्यांचे आकडे लिहिलेली पट्टी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. 

Web Title: District Police Force's campaign against liquor and gambling dens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.