भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

By युवराज गोमास | Published: September 3, 2023 04:50 PM2023-09-03T16:50:58+5:302023-09-03T16:51:04+5:30

जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधरराव जिभकाटे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने प्राथमिक विभागामधून सात, माध्यमिक विभागामधून पाच व एका विशेष शिक्षकाची जिल्हा शिक्षक पुरस्काराकरिता निवड केली आहे.

District Teacher Award announced to 13 teachers of Bhandara Zilla Parishad | भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

googlenewsNext

भंडारा : जिल्हा परिषद, भंडाराअंतर्गत २०२३-२४करिता जिल्हा शिक्षक पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. एकूण १३ शिक्षक कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने पुरस्कार देऊन लवकरच सन्मानित करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधरराव जिभकाटे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने प्राथमिक विभागामधून सात, माध्यमिक विभागामधून पाच व एका विशेष शिक्षकाची जिल्हा शिक्षक पुरस्काराकरिता निवड केली आहे. निवड यादीस नागपूर विभागीय आयुक्तांनी मंजुरी प्रदान केली आहे.

जिल्हा निवड समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, मुख्य कार्यपालन अधिकारी समीर कुर्तकोटी, शिक्षण व क्रीडा समिती सभापती रमेश पारधी, समाज कल्याण समिती सभापती मदन रामटेके, महिला व बालविकास समिती सभापती स्वाती वाघाये, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य राजेश रुद्रकार, माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचे कौतुक केले आहे.

पुरस्कारप्राप्त शिक्षक

प्राथमिक विभाग : मोना रामदास सार्वे, जि. प. प्राथ. शाळा सावरी, मीरा डमदेव कहालकर, जि. प. उच्च प्राथ. शाळा निमगाव, तुळशिदास इसराम पटले, जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा साकोली, पांडुरंग गंगाधर धकाते, जि. प. प्राथमिक शाळा शिवनाळा, ज्योती सहदेव नागलवाडे, जि. प. प्राथमिक शाळा कुरमुडा, संजय श्रीराम झंझाड, जि. प. उच्च प्राथमिक शाळा पाचगाव, प्रकाश भीमराव हेडाऊ, जि. प. प्राथमिक शाळा ईटान.

माध्यमिक विभाग : धनराज रामजी हटवार, जकातदार विद्यालय भंडारा, युवराज दयाराम खोब्रागडे, जि. प. हायस्कूल, पालांदूर, विलास भिवराज लांजेवार, जि. प. हायस्कूल एकोडी, संदीप दादाराम आडे, जि. प. हायस्कूल, डोंगरी (बूज), मदन बलदेव मेश्राम, जि. प. हायस्कूल सरांडी.

विशेष शिक्षक : सुनील रामभाऊ खिलोटे, क्रीडाशिक्षक, लाल बहादूर शास्त्री विद्यालय, भंडारा.

Web Title: District Teacher Award announced to 13 teachers of Bhandara Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.