जिल्हा युवक काँग्रेसतर्फे केंद्र सरकारला रोजगाराची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 05:00 AM2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:01:23+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारच्या बेजबाबदार धोरणाचा विरोध करून युवकांना रोजगार देण्यासंबंधी निवेदन दिले. यानंतर सनफ्लॅग स्टील व अशोक लेलॅण्ड या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून स्थानिक युवकांना तेथे समाविष्ट करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनामुळे देशात १२ कोटी पेक्षा अधिक लोकांची नोकरी गेलेली आहे. यानंतरही केंद्र सरकारच्या विभिन्न विभागात १० लाखांपेक्षा अधिक रिक्त पदांवर बंदी घातली आहे. यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात युवक काँग्रेस तर्फे रोजगार दो अभियानाला सुरुवात भंडारा जिल्ह्यातून करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारच्या बेजबाबदार धोरणाचा विरोध करून युवकांना रोजगार देण्यासंबंधी निवेदन दिले. यानंतर सनफ्लॅग स्टील व अशोक लेलॅण्ड या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून स्थानिक युवकांना तेथे समाविष्ट करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, महाराष्ट्र प्रदेश महासचिव जिया पटेल, जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश कारेमोरे, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, भंडारा तालुकाध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, प्रदेश समन्वयक अनुसूचित जाती विभाग डॉ.विनोद भोयर, जिल्हा महासचिव तथा निरीक्षक भंडारा धनंजय तिरपुडे, जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे, शिशीर वंजारी, जिल्हा महासचिव राजकपुर राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. रोजगार दो अभियानासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक महासचिव अजित सिंग, भंडारा विधानसभा युवक अध्यक्ष भुषण टेंभुर्णे, विष्णू रणदिवे, सचिन फाले, शाहीन मुन, शैलेश पडोळे, प्रकाश देशमुख, नरेश करंजेकर, आकाश काकडे, मुकुंद साखरकर, अय्युब पटेल, मंगेश हुमणे, प्रतीक फुलसूंगे, प्रदीप डेकाटे, अमित खोब्रागडे, आकाश बोंद्रे सुरेंद्र चिंदालोरे, कमल साठवणे, प्रफुल बिसने, निखिल तिजारे आदींनी सहकार्य केले.