खराडी परिसरातील गावे दुष्काळग्रस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 09:36 PM2018-10-24T21:36:13+5:302018-10-24T21:36:28+5:30

भंडारा तालुक्यातील खराडी-राजेदहेगाव परिसरातील गावे पेंच पाटबंधारे विभागाच्या पाण्यापासून वंचित राहिली आहे. ही गावे टेलवर असल्यामुळे पेंचचे पाणी पोहचण्या अगोदरच पेंचचे पाणी बंद झाले. परिणामी खराडी व राजेदहेगाव परिसरातील गावाला पाणी न मिळाल्याने धान पीक पुर्णत: सुकले आहे.

Ditch the villages in Kharadi area | खराडी परिसरातील गावे दुष्काळग्रस्त करा

खराडी परिसरातील गावे दुष्काळग्रस्त करा

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शेतकरी आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क
खरबी (नाका) : भंडारा तालुक्यातील खराडी-राजेदहेगाव परिसरातील गावे पेंच पाटबंधारे विभागाच्या पाण्यापासून वंचित राहिली आहे. ही गावे टेलवर असल्यामुळे पेंचचे पाणी पोहचण्या अगोदरच पेंचचे पाणी बंद झाले. परिणामी खराडी व राजेदहेगाव परिसरातील गावाला पाणी न मिळाल्याने धान पीक पुर्णत: सुकले आहे.
या सर्व प्रकरणाला पेंच पाटबंधारे विभाग शाखा खरबी नाका जबाबदार असल्याचे पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष निरंजन मुस्कारे यांनी म्हटले. खराडी-राजेदहेगाव पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष यांनी दोन्ही गावातील धान उत्पादक शेतकºयांची राजेदहेगाव येथे सभा घेण्यात आली.
या सभेला जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती पे्रमदास वनवे उपस्थित होते. यांनी परिसरातील धान पिकांची पाहणी केली. प्रेमदास वनवे यांनी शासनाकडे ही गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. पाणी वापर समितीने पेंच पाटबंधारे विभागाकडे वारंवार पाण्याची मागणी केली. दोन दिवसात चार दिवसात पाणी देतो म्हणून शेतकºयांची फसवणूक केली आहे. मागील तीन वर्षापासून या गावांना पेंच पाटबंधारे विभागाचे पाणी मिळत नाही.
एका पाण्यापासून धानाचे हातचे पिक जात आहे. या संपूर्ण प्रकरणाला पेंच पाटबंधारे विभाग जबाबदार आहे. त्यामुळे शेतकºयांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.
शेतकºयांनी पीक लागवडीसाठी बँकेचे पिक कर्जे घेतले. ही कर्जे कशा प्रकारे फेडावे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. यासाठी शेतकºयांच्या शिष्टमंडळाने ही गावे दुष्काळग्रस्त घोषित करून नुकसान भरपाई देण्यात यावी, या प्रमुख मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांना जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रेमदास वनवे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष निरंजन मुस्कारे, उपाध्यक्ष अनिल हिवसे, सचिव श्याम पत्रे यांनी दिले. यावेळी ग्रामपंचायत राजेदहेगाव येथील सरपंच रामचंद्र लेंडे, ग्रामपंचायत खराडी येथील सरपंच संजय हिवसे, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी बांधवांची उपस्थित होती.

Web Title: Ditch the villages in Kharadi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.