दुभाजकावर लागले पथदिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 10:46 PM2018-06-04T22:46:58+5:302018-06-04T22:46:58+5:30

स्वच्छ शहर, सुंदर शहरच्या ब्रिदवाक्याला प्रत्यक्षात उतरविण्याकरिता भंडारा-तुमसर मुख्य मार्गावरील दुभाजकावर पथदिवे लावण्यात आले आहे. परिणामी शहराच्या सौंदर्यात आणखीही भर पडली आहे.

On the divider | दुभाजकावर लागले पथदिवे

दुभाजकावर लागले पथदिवे

Next
ठळक मुद्देसौंदर्यात पडली भर : शहराच्या सीमेवर झगमगाट

राहुल भुतांगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : स्वच्छ शहर, सुंदर शहरच्या ब्रिदवाक्याला प्रत्यक्षात उतरविण्याकरिता भंडारा-तुमसर मुख्य मार्गावरील दुभाजकावर पथदिवे लावण्यात आले आहे. परिणामी शहराच्या सौंदर्यात आणखीही भर पडली आहे.
तांदळाची व कुबेर नगरी समजल्या जणाऱ्या तुमसर शहराला स्वच्छ व सुंदर शहर बनविण्याचा विडा तत्कालीन नगराध्यक्षांनी उचलला होता. त्याच अनुषंगातून व निधीच्या उपलब्धतेनुसार खापाटोली परिसरातील भंडारा रोड मार्गावर रेल्वेफाटक ते गभणे सभागृहापर्यंत दुभाजकावर हायमास्ट लाईटचे पथदिवे व झाडे लावून शहराला सुंदर रुप देण्यात आला होता. परिणामी ‘हार्ट आॅफ द सिटी’ समजल्या जाणारा परिसर प्रकाश झोतात आल्याने शहराचे रुप पालटले. दरम्यान सत्ता परिवर्तन झाले व विविध चर्चेला उधाण आले असतांना नगराध्यक्ष प्रदिप पडोळेनी स्वच्छ शहर सुंदर शहराची संकल्पना राबविली.
शहरातील ओला व सुका कचराचे निमुलनावर भर दिले. त्याचबरोबर सांडपाण्याची व्यवस्था व रस्ते विकास करविला एवढेच नाही तर स्वच्छता मिशन मध्ये दिमाखदार कामगिरी करुन दाखविली.
शहराचा चौफेर विकासाची श्रृंखला सुरु ठेवत शहराच्या सौंदर्यीकरणावर भर घातली.
शहराच्या प्रवेशद्वारापासून भंडाराकडून शहरात येणाºया मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीपासून राजाराम लॉनपर्यंत ३८ एलएडी लाईटचे पथदिवे दुभाजकावर लावून रेल्वेफाटक ते बाजार समितीचा संपुर्ण मार्ग दिव्यांच्या लख्ख प्रकाशात झगमगत आहे.
यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुने छान रोषनाई झाली आहे. त्यामुळे ईव्हेनिंग वाक, नाईट वॉक करणाºया सर्वसामान्य नागरिकासह वयोवृध्द नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला असून अपघाताच्या संख्येत ही मोठी घट होणार असल्याने तुमसरकरांनी या कार्याचे कौतुक केले आहे.

शहराच्या चौफेर विकासाबरोबर सौंदर्यीकरण हे देखिल महत्वाचे आहे. स्मार्ट सिटीकरिता उचलले हे छोटेसे पाऊल आहे.
- प्रदिप पडोळे,
नगराध्यक्ष, तुमसर

Web Title: On the divider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.