दिव्यांगांनी उघडले संपर्क कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 09:28 PM2018-07-21T21:28:39+5:302018-07-21T21:28:55+5:30

आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहचविण्यासाठी तसेच दिव्यांगांना एकत्र आणण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मोहाडी येथे तालुका संपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.

Divyang opened office | दिव्यांगांनी उघडले संपर्क कार्यालय

दिव्यांगांनी उघडले संपर्क कार्यालय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहचविण्यासाठी तसेच दिव्यांगांना एकत्र आणण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मोहाडी येथे तालुका संपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.
मोहाडी तालुक्यात अनेक दिव्यांग व्यक्ती विखुरलेले असून शासनाच्या सोयी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहचलेल्या नाहीत त्यासाठी प्रमोद रागळवार, पंचायत समिती जवळ मोहाडी येथे अपंगासाठी संपर्क कार्यालय उघडण्यात आले आहे.
अपंग व्यक्तींनी या कार्यालयात संपर्क करावे असे आवाहन प्रहार अपंग क्रांती आंदोलन जिल्हा अध्यक्ष रवि मते, सचिव योगेश्वर घाटबांधे, उमराव डोकरीमारे, विद्या कुकडे, सिमा कोसरे, सुनिल कहालकर, एकनाथ बाभरे, मोहन निमजे, प्रमोद रागडवार, रामदयाल पराते, मोहन हटवार, अश्विन नारनवरे, वासुदेव, खेमराज मदारकर, गुलाब पंचबुद्धे, माधुरी गोन्नाडे, रंजु जांभुळकर, अनिता तितीरमारे, सरीता रागळवार, हटवार, नानाजी गाढवे, नानाजी ढबाले यांनी केले.

Web Title: Divyang opened office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.