भंडाऱ्याचे ‘दिव्यांग’ खेळाडू पुण्यात चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 10:11 PM2018-02-12T22:11:31+5:302018-02-12T22:12:04+5:30

मनुष्याच्या मनात जिद्द असली की, आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगालाही लिलया पार करता येते. अशीच खुनगाठ बांधून भंडाराच्या ‘दिव्यांगांनी’ पुणे येथील मैदानी स्पर्धा गाजविली.

The 'Divyang' player of the reservoir shines in Pune | भंडाऱ्याचे ‘दिव्यांग’ खेळाडू पुण्यात चमकले

भंडाऱ्याचे ‘दिव्यांग’ खेळाडू पुण्यात चमकले

Next
ठळक मुद्देराज्यस्तरीय स्पर्धा : तीन सुवर्णासह ९ पदके जिंकली

आॅनलाईन लोकमत
भंडारा : मनुष्याच्या मनात जिद्द असली की, आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगालाही लिलया पार करता येते. अशीच खुनगाठ बांधून भंडाराच्या ‘दिव्यांगांनी’ पुणे येथील मैदानी स्पर्धा गाजविली. वरिष्ठ व आठव्या ज्युनिअर अपंगाच्या मैदानी स्पर्धेत भंडाराच्या दिव्यांगांनी तीन सुवर्ण पदकांसह नऊ पदके जिंकून जिल्ह्याचे नावलौकीक केले.
पॅरा अ‍ॅथलेटिक्सचा राष्ट्रीय खेळाडू प्रा. योगेश्वर घाटबांधे यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या दिव्यांग खेळाडूंनी हे नेत्रदिपक यश मिळविले. यात सुदामा शेंडे, अमन खापर्डे, पवन ढाले, बालु कान्हेकर, नेहा भुरे, नादीरा धाबेकर, रंजू शेंडे, शुभम मेश्राम, पवन रहांगडाले, ओमदेव इलमे, राहुल शेंडे यांचा समावेश होता.
पुणे येथील सारसगेट येथील कै. बाबुराव सणस क्रीडा मैदानावर १४ वी राष्ट्रीय व आठवी कनिष्ठ राज्यस्तरीय अपंगाची मैदानी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भंडाराचा दिव्यांगांचा संच सहभागी झाला होतो. या स्पर्धेत योगेश्वर घाटबांधे यांना थाळीफेक, भालाफेक या खेळात एफ ५६ या गटात दोन कास्य पदक मिळाले. तर कनिष्ठ गटात सुदामा शेंडे याने १०० मीटर, २०० मीटर आणि उंच उडी या तिन्ही प्रकरणात तीन सुवर्ण पदक जिंकली. तर शुभम मेश्राम याने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कास्यपदक, अमन खापर्डे याने थाळीफेक व उंच उडी स्पर्धेत दोन कास्य पदक तर पवन ढोले याने भालाफेक स्पर्धेत एक कास्यपदक जिंकले. दिव्यांगांनी भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत हे यश मिळवून भंडाराचे नाव उंचावले आहे.

Web Title: The 'Divyang' player of the reservoir shines in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.