दिव्यांग ‘योगेश्वर’ने राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत प्राप्त केली ४८ पदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:24 PM2018-03-13T23:24:18+5:302018-03-13T23:24:18+5:30

किटाडी या लहानशा खेड्यात राहणारा योगेश्वर रवींद्र घाटबांधे या सुशिक्षीत बेरोजगारांचे अपंगावर मात करीत राज्य राष्ट्रीय स्पर्धेत ४८ पदक मिळविले.

Divyang 'Yogeshwar' won 48 medals in the state, national competition | दिव्यांग ‘योगेश्वर’ने राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत प्राप्त केली ४८ पदके

दिव्यांग ‘योगेश्वर’ने राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत प्राप्त केली ४८ पदके

googlenewsNext
ठळक मुद्देपॅरा आॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची इच्छा

आॅनलाईन लोकमत
कोंढा-कोसरा : किटाडी या लहानशा खेड्यात राहणारा योगेश्वर रवींद्र घाटबांधे या सुशिक्षीत बेरोजगारांचे अपंगावर मात करीत राज्य राष्ट्रीय स्पर्धेत ४८ पदक मिळविले. तर आंतरराष्ट्रीय पॅराआॅलंपिक स्पर्धेमध्ये भारताच प्रतिनिधीत्व करीत सुवर्णपदक मिळवून देण्याची त्यांची इच्छा आहे. पण शासनाकडून त्याची उपेक्षा सुरु आहे. मनात जिद्द असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. हे त्यांनी दाखवून दिले आहे.
खेळांची आवड असणारा योगेश्वर घाटबांधे लहानपणी पोलिओ झाल्याने त्यास अपंगत्व आले. मात्र त्याने जिद्द सोडली नाही. दहावी परिक्षा किटाडी येथे आनंदीबाई हायस्कूलमध्ये उत्तीर्ण केले. ज्यु. कॉलेजचे शिक्षण अड्याळ ज्यु. कॉलेज अड्याळ व पुढील शिक्षण अशोक मोहरकर महाविद्यालय अड्याळ येथे पूर्ण केले. कॉलेजचे शिक्षण घेत असताना त्याने अपंगाच्या स्पर्धामध्ये भाग घेतले. त्यास यश मिळाले. जिल्हासतरीय स्पर्धा गाजविल्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धा व राष्ट्रीय स्पर्धात भाग घेवून त्या गाजविल्या नुकतीच ३ व ४ फेब्रुवारी २०१८ ला अपंगाची राज्यस्तरीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धा पुणे येथे संपन्न झाली. त्यामध्ये एफ ५६ गटात भालाफेक, थाळीफेक आणि गोळाफेकमध्ये कास्यपदक मिळविले. राज्य व राष्टÑीय स्पर्धेत आतापर्यंत ४८ पदक त्यांनी मिळविली आहेत. यात १८ सुवर्ण, २६ रौज्य आणि १४ कास्य पदक आहेत. यासाठी ते प्रेरणास्थान नागपूरच्या विरजा अपंग प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षा व स्वत: अपंग असलेल्या रेणुका बिडकर यांना मानतात. त्यांनी मला प्रथम संधी मिळवून दिली असे योगेश मानतो. २००७-०८ मध्ये चैन्नई येथे आठ देशांच्या आंतरराष्ट्रीयय स्पर्धेपासून योगेश्वरच्या क्रीडा कारकिर्दीला खरा आकार मिळाला.
सन २००९, २०१०, २०११ मध्ये नागपूर येथे झालेल्या अपंगांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा व बंग्लोर, चंदीगढ, गाझियाबाद, जयपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने भाग घेऊन पदक मिळविली आहेत. २०१५ मध्ये गाझियाबाद येथे झालेल्या पॅराअ‍ॅथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रच कर्णधारपद त्याने भुषविले आहे. या स्पर्धेत भालाफेक, थालीफेक प्रकारात कास्यपदक मिळवून आपली सिध्दता दाखविली आहे.
खेळाप्रमाणे शिक्षणावरही योगेश्वरने प्रकड ठेवली आहे. त्याने एम ए. एम.एड पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. किटाडी येथे ज्यु. कॉलेजमध्ये गेल्या पाच वर्षापासून अर्धवेळ प्राध्यापक म्हणून काम करीत आहे. गावात पाणलोट समिती, सचिव म्हणून देखील काम करीत आहे. अपंग मुलामुलींना त्याचे ऐवढेच सांगणे आहे. स्वत:ला दुर्बळ समजू नका, मनात जिद्द ठेवा, जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही असे त्याचे सांगण आहे.

Web Title: Divyang 'Yogeshwar' won 48 medals in the state, national competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.