दिवाळी अंक महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 09:41 PM2018-11-19T21:41:38+5:302018-11-19T21:41:50+5:30

लेखक वाचकांचे भावविश्व घडवीत असतो. पण लेखक जर माणूसकेंद्री लेखनापासून जर लेखक ढळला तर सगळा समतोल बिघडतो. दिवाळी अंक वाचकांसाठी अनेक लेखक एकत्रितपणे पोहोचविण्याचे मोठे काम करतात.

Diwali issue: Maharashtra's biggest cultural tradition | दिवाळी अंक महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक परंपरा

दिवाळी अंक महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक परंपरा

Next
ठळक मुद्देसुरेश खोब्रागडे : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात दिवाळी अंकाचे प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लेखक वाचकांचे भावविश्व घडवीत असतो. पण लेखक जर माणूसकेंद्री लेखनापासून जर लेखक ढळला तर सगळा समतोल बिघडतो. दिवाळी अंक वाचकांसाठी अनेक लेखक एकत्रितपणे पोहोचविण्याचे मोठे काम करतात. व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठीही वाचन अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. युवकांनी त्यापासून दूर जाऊ नये. दिवाळी अंकांची मोठी सांस्कृतिक परंपरा महाराष्ट्राने सांभाळली आहे. त्या परंपरेचे आपण पाईक ठरू या! असे उद्गार डॉ.सुरेश खोब्रागडे सुप्रसिद्ध कवी, नाटककार यांनी दिवाळी अंकांच्या प्रदर्शनीच्या उदघाटनप्रसंगी उद्घाटनीय भाषण करताना काढले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, भंडाराच्या विद्यमाने दिवाळी अंकाच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले होते. या दिवाळी अंक प्रदर्शनीचे उदघाटन सुप्रसिद्ध कवी, नाटककार डॉ.सुरेश खोब्रागडे यांनी केले. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड व सुप्रसिद्ध कवी प्रमोदकुमार अणेराव यांची या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी सेवानिवृत प्राचार्य तथा सामाजिक कार्यकर्ते गुरुप्रसाद पाखमोडे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी केले. या प्रसंगी अमृत बन्सोड व प्रमोदकुमार अणेराव यांनी वाचन संस्कृतीच्या लयास जाण्याविषयी चिंता व्यक्त करीत, वाचन संस्कृतीच्या विकसनासाठी काय काय करता येईल याविषयी समयोचित भाषण केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे कर्मचारी नारनवरे यांनी केले. आभार प्रदर्शन कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रसिध्द आंबेडकरी विचारवंत प्राचार्य भगवान सुखदेवें आणि अनेक श्रोते, अभ्यासक उपस्थित होते. वाचकांच्या सोयीसाठी हे प्रदर्शन एक सप्ताह चालणार आहे.

Web Title: Diwali issue: Maharashtra's biggest cultural tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.