वंचिताच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 09:54 PM2017-10-22T21:54:46+5:302017-10-22T21:54:56+5:30

वर्षातील एक महत्त्वाचा व प्रकाशाचा उत्सव दिवाळी सण समस्त नागरिक पाच दिवस मोठ्या थाटामाटात, दिमाखात व आकर्षक रोषणाईने आपल्या ऐपतीप्रमाणे साजरा करीत असतात.

 Diwali, which creates light in the life of yoga | वंचिताच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी दिवाळी

वंचिताच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी दिवाळी

Next
ठळक मुद्देदिवाळी भाऊबीज भेट : सामाजिक जाणिवेचा अनोखा उपक्रम

चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : वर्षातील एक महत्त्वाचा व प्रकाशाचा उत्सव दिवाळी सण समस्त नागरिक पाच दिवस मोठ्या थाटामाटात, दिमाखात व आकर्षक रोषणाईने आपल्या ऐपतीप्रमाणे साजरा करीत असतात. परंतु समाजात आजही असे अनेक घटक आहेत की, विपरित परिस्थितीमुळे त्यांच्या जीवनात या प्रकाशपर्वातही अंधारच असतो.
अशाच वंचित, दीनदुबळ्या, निराधार, दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सुद्धा एक दिवस आनंदाचा जावा, गोडधोड पदार्थांची चव त्यांनी चाखावी या उदात्त हेतूने, नेहमीच आपल्या उपक्रमशील कल्पनेतून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर राहणारे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पी.पी. झोडे यांच्या कल्पनेतून व पुढाकारातून अवघ्या काही तासात टास उपक्रमासाठी तयार केलेल्या भाऊबिज व्हॉटस्अ‍ॅप ग्रृपच्या सहाय्याने परिसरातील समाज ऋणाची जाण असलेले शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक, विविध विभागातील सन्माननीय गण असे ५०-६० सहृदयी व्यक्ती एकत्र येऊन उपक्रम राबविण्यात तन मन धनाने मदत करण्यास तयार झालेत.
नियोजनानुसार ग्रामपंचायत सावरी ता.लाखनी येथे सर्व एकत्रित येऊन सर्वांना उपक्रमाचा हेतू कळावा व कार्यपद्धती समजण्यासाठी भागवत नान्हे सावरी यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक जाणीवेतून उपस्थित असणारे दिलीप वाघाये, गशिअ पं.स. लाखनी, राठोड, भंडारा, नान्हे नवनिर्वाचित सरपंच सावरी, टेंभुर्णे, पाखमोडे, मोहबंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत नरेश नवखरे यांच्या प्रास्ताविकातून व विवेक बोरकर यांच्या सूत्रसंचालनात उमेश गायधनी, केसरीलाल गायधनी, उमेश सिंगनजुडे, उरकुडे, आंबेडारे, रामटेके, काळबांधे, राम चाचेरे, सी.जी. गिºहेपुंजे, गुलशन ठवकर, ज्ञानेश्वर लांडगे, योगीराज देशपांडे, डडेमल, प्रमोद खेडीकर, खंडाते, दर्याव तिरपुडे, मिताराम लांडगे, संतोष सिंगनजुडे, वंजारी पो.पा. व इतर अनेक सहृदयी जणांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या शुभेच्छारुपी मार्गदर्शनात उपक्रमाचा उद्देश व दिलेल्या सहकार्याबद्दल पी.पी. झोडे यांनी सर्वांचे आभार मानून स्पष्ट केला. प्रत्यक्षात भाऊबीज भेट उपक्रमाचा प्रारंभ वरील सर्व सहृदयी जणांच्या उपस्थितीत व हस्ते सावरी गावात निदर्शनास आलेले गरजू, वंचित, निराधार, दुर्बल, दिव्यांग व्यक्तींच्या घरी सामूहिकपणे जाऊन त्यांना व कुटुंबाला जमा केलेल्या निधीतून खरेदी करून जीवनोपयोगी साहित्य व घरून आणलेला दिवाळी फराळ भाऊबिज भेट म्हणून देऊन समाजाप्रती असलेली आपली संवेदना, भूमिका व्यक्त करून काही वंचितांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न उपक्रमाच्या माध्यमातून केला.आजच्या उपक्रमातून सामाजिक दायीत्वाची प्रेरणा अनेक नागरिकांत निर्माण होऊन पणतीच्या प्रकाशाचे रुपांतर दिव्यात होऊन सामाजिक समता जोपासण्याचे महत्वपूर्ण कार्य आजच्या उपक्रमाच्या माध्यमातून होईल हा विश्वास आहे. आजच्या उपक्रमाची कल्पना आखून प्रत्यक्षात आणणारे पी.पी. झोडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Web Title:  Diwali, which creates light in the life of yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.