उत्कृष्ट संवादातून कुटूंब व समाजाचे हित जोपासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 10:17 PM2019-01-20T22:17:11+5:302019-01-20T22:17:59+5:30
मानवी जीवनात जे विचार केव्हा आचार उपकारक होतील त्या सर्वांना निती किंवा सद्गुण असे म्हटले जाते. आणि जे विरोधी असेल त्यांना दुर्गुण म्हणावे. या दोघांच्या अंतरात उत्कृष्ट संवादाच्या माध्यमातून कुटूब व समाजाचे हित जोपासणे अत्यंत महत्वाची बाब आहे, असे प्रेरणादायी विचार प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी व्यक्त केले.
भंडारा : मानवी जीवनात जे विचार केव्हा आचार उपकारक होतील त्या सर्वांना निती किंवा सद्गुण असे म्हटले जाते. आणि जे विरोधी असेल त्यांना दुर्गुण म्हणावे. या दोघांच्या अंतरात उत्कृष्ट संवादाच्या माध्यमातून कुटूब व समाजाचे हित जोपासणे अत्यंत महत्वाची बाब आहे, असे प्रेरणादायी विचार प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी व्यक्त केले.
मकरसंक्रातीच्या पर्वावर ‘लोकमत’ तर्फे गुड बोला गोड बोला’ अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत बोलताना भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य ढोमणे म्हणाले, संवादातून कधीकधी राग व्यक्त केला जातो. परंतु राग हा एका मर्यादेपर्यंत पोहचल्यावर स्वत: व दुसऱ्याच्या आयुष्यावर परिणाम करतो.
म्हणून रागावर नियंत्रण ठेवून संवादात गोडवा असणे अत्यंत गरजेचे आहे.
सध्याचे युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे असल्यामुळे सामान्यांपर्यंत अद्यायावत ज्ञान पोहचणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनीही संवादातून आई-वडील व गुरुजणांचा आदर करणे अत्यंत महत्वाची बाब आहे.
आज घडीला विद्यार्थ्यांमध्ये तत्वज्ञानाची अत्यंत उणीव आहे. त्याची भरपाई होणे महत्वाचे असून संत व थोर पुरुषांनी प्रेमळ संवादाला प्रभावी अस्त्र म्हटले आहे. प्रत्येकाने आपसातील वैर विसरुन सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी प्रयत्न साधणे गरजेचे आहे.