वाईट घटनांचे मूक साक्षीदार होऊ नका

By admin | Published: September 11, 2015 12:59 AM2015-09-11T00:59:29+5:302015-09-11T00:59:29+5:30

आपण ज्या समाजात जीवन जगतो त्या समाजात जीवन जगतो त्या समाजात काही वाईट प्रवृत्तीचे माणसेही आपल्यासोबत जीवन जगत असतात.

Do not be silent witnesses of bad events | वाईट घटनांचे मूक साक्षीदार होऊ नका

वाईट घटनांचे मूक साक्षीदार होऊ नका

Next

कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर : पोलीस अधीक्षक झळके यांचे प्रतिपादन
दिघोरी (मोठी) : आपण ज्या समाजात जीवन जगतो त्या समाजात जीवन जगतो त्या समाजात काही वाईट प्रवृत्तीचे माणसेही आपल्यासोबत जीवन जगत असतात. वाईट विचारांनी प्रेरीत झालेले नागरीक समाजात विविध प्रकारचे गुन्हे करीत असतात. अशा आपल्या समोर घडलेल्या गुन्ह्यांचा प्रतिकार करा किंवा पोलिसांपर्यंत संबंधित गुन्ह्यांची माहिती द्या.
यामुळे समाजात घडणाऱ्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यास मदत होईल. परंतु आजघडीला एक जबाबदार नागरीक या नात्याने गुन्ह्यांची माहिती देण्यास नागरिक समोर येत नाहीत. आपल्या समोर घडणाऱ्या वाईट घटनांचे मुक साक्षीदरा होऊ नका. कारण आज दुसऱ्यांवर वाईट प्रसंग ओढवला आहे. कदाचित उद्या आपल्यावरही वाईट प्रसंग ओढवू शकतो.
त्यामुळे समाजात घडणाऱ्या विविध वाईट घटनांचे मुक साक्षीदार बनू नका तर त्या घटनेला प्रतिकार करा, पोलिसांना माहिती द्या. यामुळे समाज व पोलीस एकमेकांचे चांगले मित्र म्हणून समोर येतील असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक झलके यांनी दिघोरी येथील मार्गदर्शन शिबिरात केले.
महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर दिघोरी / मोठी येथील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक झलके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धरमसिंग व दिघोरीचे ठाणेदार बी.जे. यादव हे होते. स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर जि.प. ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थिनींनी हुंडाबळी या विषयावर पथनाट्य सादर केले.
अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांनी स्वत:ला कुठेही कमी लेखू नये. समाजातील काही वाईट प्रवृतीचे नागरीक जर छेडछाड करीत असतील तर त्याचा मुकाबला धैर्याने करा. घाबरून जावू नका. पुढे बोलतांनी त्या म्हणाल्या महिलांना कायद्याने खूप मोठे संरक्षण पुरविले आहे. कलम ३५४, ३७३, ३०६, ३६३ इत्यादीविषयी संपूर्ण माहिती समाजवून सांगितले.
सदर कायदेविषयक शिबिरात वर्ग १२ वी च्या विद्यार्थिनी, मुकुंद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, गावातील व आसपासच्या महिला, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, आशा वर्कर, महिला बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पोलीस ठाणे दिघोरी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सोनपराते यांनी तर आभार गीताबाई बांगरे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Do not be silent witnesses of bad events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.