अफवांवर विश्वास ठेवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 01:01 AM2018-07-06T01:01:18+5:302018-07-06T01:01:45+5:30
मुलं पळवून नेणारी टोळी सक्रीय आहे. ही टोळी गल्लोगल्ली फिरून एकांतात असलेल्या बालकाला अलगद उचलून पळवून नेतात. किडणी चोर सुध्दा आले म्हणतात.. अश्या अफवानी समाज दुषित झाले आहे. या केवळ अफवाच आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : मुलं पळवून नेणारी टोळी सक्रीय आहे. ही टोळी गल्लोगल्ली फिरून एकांतात असलेल्या बालकाला अलगद उचलून पळवून नेतात. किडणी चोर सुध्दा आले म्हणतात.. अश्या अफवानी समाज दुषित झाले आहे. या केवळ अफवाच आहेत. यात अंधपणाने विश्वास ठेवून कायदा हातात घेऊ नये. शंकास्पद व्यक्ती किंवा समुह आढळल्यास तात्काळ पोलिस ठाणेला कळवा व
अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाह पोलिस निरिक्षक अंबादास सुणगार यांनी केले.
गावातील मान्यवर व पोलीस पाटील यांना केले आहे. ते पोलीस ठाणे येथे पोलीस अधिक्षक विनिता साहू यांच्या आदेशावरुन बैठकीत बोलत होते.
बैठकीला रमेश कापसे, गुणवंत बोरकर, माया खंडाईत, पियुश बाच्छल, कचरु शेंडे यांनीही विचार व्यक्त केले.
सुनगार म्हणाले, गावात मुसाफिर आल्यास प्रथम पोलीस स्टेशनला कळविणे गरजेचे आहे. बिना माहितीने समाजकंटक व्हॉट्स अॅप, फेसबुकच्या माध्यमातून मुले पळविणारी टोळी आली किंवा चोर आले समजून काही जिल्हयात बहुरुपी, वाटसरु, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडत आहेत.या सर्व प्रकारामुळे समाजमन दूषित झाले आहे.
या दूषित भावनेतून धोका घडू शकतो. त्यामुळे प्रत्येकांनी स्वत:ची जबाबदारी समजत समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करावे. आभार भोजराज भलावी यांनी केले.