घरगुती गॅस असणाऱ्यांच्या शिधापत्रिका रद्द करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:34 AM2021-03-20T04:34:49+5:302021-03-20T04:34:49+5:30
तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी लाखनी : अन्न व नागरीपुरवठा विभागाकडून शिधापत्रिका तपासणी नमुनाद्वारे शिधापत्रिकाधारकांची माहिती मागविण्यात येत आहे, ...
तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
लाखनी : अन्न व नागरीपुरवठा विभागाकडून शिधापत्रिका तपासणी नमुनाद्वारे शिधापत्रिकाधारकांची माहिती मागविण्यात येत आहे, तसेच या माहितीपत्रकात शिधापत्रिकाधारकांसाठी गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र द्यायाचे आहे. सदर हमीपत्रात हमीपत्र लिहून देणाऱ्या शिधापत्रिका कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गॅस जोडणी असल्यास अशा शिधापत्रिका रद्द करण्यात येतील, असे नमूद आहे. महाराष्ट्रातील लाखो गरजू , गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, कामगार कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे.
गॅस जोडणी आहे, म्हणून गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, कामगारांची शिधापत्रिका रद्द करण्यात येणार असेल, तर ही गोरगरिबांची, सर्वसामान्यांची कुचेष्टा होईल. शिधापत्रिका रद्द केल्यामुळे जर गोरगरिबांच्या उदरनिर्वाहाकरिता शासनाकडून अन्नधान्यच मिळणार नसेल, तर गॅस जोडणी ठेवून उपयोग तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. केंद्र शासनाच्या तुघलकी कारभारामुळे इंधनाचे दर दिवसेंदिवस गगनभरारी घेत आहे. आधीच सर्वसामान्यांच्या कंबरडे मोडले आहे आणि अशात जर सर्वसामान्य, गोरगरिबांच्या हक्काचा अन्यधान्यही बंद होत असेल, तर महाराष्ट्रातील लाखो कुटुंबावर अन्याय होईल. शिधापत्रिका तपासणी नमुन्यातील हमीपत्र रद्द करण्यात येऊन गॅस जोडणी असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची शिधापत्रिका रद्द करण्यात येऊ नये.
या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री यांना तहसीलदार लाखनी यांच्यामार्फत पाठविण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ.विकास गभने, शहर अध्यक्ष धनु व्यास, ओबीसी सेलचे अध्यक्ष नागेश पाटील वाघाये, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अर्चना ढेंगे, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष जितेंद्र बोंद्रे यांचे नेतृत्वात माजी नगरसेवक मनोज टहील्यानी, बबलू निंबेकर, नूतन मेंढे, रजनी मुळे, नानाजी सिंगनजुडे, सुहास बोरकर, मयूर वंजारी, उर्मिला आगाशे, प्रशांत मेश्राम, मनोज पोहरकर, शैलेश गायधनी, सुनील बर्वे, अशोक हजारे, अरमान धरमसारे, नीलेश गाढवे, संगीता उईके, रामकिशोर गिरेपुंजे, नितीन निर्वाण, सुरेंद्र निर्वाण, राजू शिवरकर, मुन्ना वरवाडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.