दिवाबत्तीचा वीजपुरवठा खंडित करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:24 AM2021-06-24T04:24:10+5:302021-06-24T04:24:10+5:30
२३ लोक ०२ के अडयाळ : उपअधीक्षक अभियंता विद्युत वितरण विभाग पवनी यांना सरपंच सेवा महासंघ भंडाराच्यावतीने निवेदन देण्यात ...
२३ लोक ०२ के
अडयाळ : उपअधीक्षक अभियंता विद्युत वितरण विभाग पवनी यांना सरपंच सेवा महासंघ भंडाराच्यावतीने निवेदन देण्यात आले. त्यात सार्वजनिक विद्युत पुरवठा खंडित न करण्याबाबतचा विषय घेऊन पवनी तालुका सरपंच सेवा संघटनेच्यावतीने भोयर यांना लेखी निवेदन देण्यात आले. त्यात पावसाळ्याचे दिवस असल्याने तसेच आजतागायत कोणत्याही ग्रामपंचायतीने सार्वजनिक दिवाबत्तीचे वीज बिल आजपर्यंत कधीही भरलेले नाही. सदर बिल जिल्हा परिषद, राज्यशासन भरत असे, याबाबत लेखी तोंडी निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला वेळोवेळी देण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वी असाच विद्युत पुरवठा खंडित करण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. परंतु त्यावेळी सरपंच संघटनेचे शासन प्रशासनाला निवेदन सादर होताच ते उपक्रम थांबविण्यात आले होते. सध्याची वेळ पावसाळ्याची लक्षात घेता विद्युत पुरवठा खंडित करणे थांबविणे अन्यथा पवनी तालुका सरपंच सेवा महासंघ संघटना आपल्या विरोधात आमरण उपोषण करणार. यात अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी स्वीकारावी, असेही त्यात नमूद आहे.
सध्या शेतकरी तथा शेतमजूर हा शेतकामात व्यस्त आहे, दुसरीकडे कोरोनाचे संकट अद्यापही टळले नसून धास्तीनेचं जीवन जगणे सुरू आहे. त्यामुळे सर्वांनी सतत दोन वर्षे कसे दिवस काढले, किती हाल सहन करत दिवस काढले, हे ज्यांचे त्यांनाच जास्त ठाऊक आहे. अशाही बिकट स्थितीत आज अनेक ग्रामपंचायतीला मिळणारे कर सुध्दा मिळाले नाही, या अशाही बिकट परिस्थितीत शासनाने लादलेल्या या परिस्थितीला तालुक्यातील ग्रामपंचायत कशी समोर जाणार याच विवंचनेत प्रत्येक ग्रामपंचायत दिसत आहे. या अनुषंगाने पोलीस स्टेशन अडयाळचे ठाणेदार सुशांत पाटील प्रतिलिपी म्हणून निवेदन देण्यात आले. यावेळी पवनी तालुका सरपंच सेवा संघटनेचे अध्यक्ष अनिता गिर्हेपुंजे तसेच अनेक ग्रामपंचायतमधील सरपंच उपस्थित होते.