मतभेद विसरुन ग्रामविकासासाठी पुढे या!
By admin | Published: October 8, 2016 12:33 AM2016-10-08T00:33:05+5:302016-10-08T00:33:05+5:30
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील सर्व घटकांनी आपसातील मतभेद विसरुन पुढाकार घ्यावा ...
सामाजिक, कृतज्ञता पुरस्कार : प्रदिप बुराडे यांचे आवाहन
विरली (बु.) : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील सर्व घटकांनी आपसातील मतभेद विसरुन पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रदिप बुराडे यांनी केले. ते स्थानीक गांधी मैदानावर आयोजित सामाजिक कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळयात बोलत होते.
येथील ग्रामीण युवक विकास प्रसारक मंडळाच्यावतीने गावाचा नावलौकीक वाढविण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळयाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे माजी अध्यक्ष अन्नाजी बेदरे हे होते. अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. ईश्वर नंदपुरे, जि.प. सदस्य प्रदिप बुराडे, केवळराम पटोले, हरिभाउ घोसेकर, पंचायत समिती सदस्य नेहा बगमारे, पंचशील धान गिरणी मासळचे अध्यक्ष भुमेश्वर महावाडे, शंकरराव हुमने, माजी जिल्हा परिषद सदस्य वामनराव बेदरे, घनशाम राउत, हरिश्चंद्र बुराडे, डॉ. संभाजी चुटे उपस्थित होते.
यावेळी बुराडे म्हणाले, मागील ५० वर्षांपासून कार्यरत असलेल्या या मंडळाने समाजाला अनेक हिरे दिलेले आहेत. आणि ते आपापल्या क्षेत्रात भरीव कार्य करुन देशाच्या प्रगतीसाठी झटत आहेत. मंडळाचे हे व्यासपीठ सर्वांना मोठे करणारे असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी किसन भेंडारकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर बुराडे, माधव चुटे, शालिनी चुटे, बुधराम भुते, नीळकंठ मेंढे, प्रा. कामराज रामटेके, शंकरराव हुमने, बळीराम पवनकर, गणेश बगमारे, राजू आत्राम, पांडूरंग सोंदरकर, जगन मेश्राम, घनशाम राउत, भगवान आत्राम, आबाजी चुटे, रामकृष्ण मेश्राम, सुधाकर पारधी, कमलाबाई चुटे, अरुणा बन्सोड, कमलताई मुंडले, कामुना बन्सोड, कांताबाई हुकरे, रेवाताबाई ब्राम्हणकर, तंमुसचे अध्यक्ष हरिश्चंद्र चुटे, माजी सरपंच ताराचंद चुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर महावाडे, वानमराव बेदरे, भुमेश्वर महावाडे, गुंडेराव बागडे, शिवाजी ब्राम्हणकर, एकनाथ भेंडारकर, हरिश्चंद्र डहाके, चिंतामन वकेकार, प्रकाश सुखदेवे, डॉ. ईश्वर नंदपुरे, विनायक बेदरे, केवळराम पटोले, वामन कोरे, रामाजी वकेकार, श्रावण आत्राम, हरिभाउ घोसेकर, बाबाजी महावाडे यांचा समावेश होता. सत्कारमुर्तीना शाल, मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले. प्रास्ताविक उध्दव कोरे यांनी केले. संचालन दीपक बागडे यांनी तर आभारप्रदर्शन दामोधर बागडे यांनी केले. कार्यक्रमासाठी मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)