शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वधू मिळेना; भंडारा जिल्ह्यातील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:43 AM2018-12-14T11:43:23+5:302018-12-14T11:45:06+5:30

ग्रामीण भागात लग्नाकरिता सर्वत्र मुली पाहण्याची शोध मोहीम सुरू आहे. त्यानिमित्ताने गावागावात मंडई व नाटकाचे आयोजन केले जात आहे. मात्र आता मुलींना भूमिहीन शेतमजूर मुलांना नापसंती सुरू आहे.

Do not get a bride for farmers' children; Reality in Bhandara District | शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वधू मिळेना; भंडारा जिल्ह्यातील वास्तव

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वधू मिळेना; भंडारा जिल्ह्यातील वास्तव

googlenewsNext
ठळक मुद्देव्यथा शेतकरी कुटुंबांची शासकीय नोकरदारांनाच वधूपित्याची पहिली पसंती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रामीण भागात लग्नाकरिता सर्वत्र मुली पाहण्याची शोध मोहीम सुरू आहे. त्यानिमित्ताने गावागावात मंडई व नाटकाचे आयोजन केले जात आहे. मात्र आता मुलींना भूमिहीन शेतमजूर मुलांना नापसंती सुरू आहे. मुलाकडे शेती पाहिजे मात्र मुलगा शेतकरी नको आहे. त्यामुळे पालकवर्गाची मुलीसाठी, मुलांसाठी धावपळ सुरू आहे. परिणामत: पालकाकडून विनवणी केल्या जात आहे की, फक्त मुलगी द्या, लग्न आम्हीच करू हे बोलके चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहेत.
पुरूषधान समाजात उपवराचे पुर्वी पारडे जळ असायचे. हुंडा मिळाला नाही किंवा मानपान झाले नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल असायची. परंतु आता बदलत्या परिस्थितीत मुलीची संख्या घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे.
पुर्वी मुलाच्या शोधासाठी मुलीचे पालक मुलगा मिळेल का म्हणून महिना महिना नातेवाईकाच्या घरी फिायचे मात्र आता परिस्थिती बदलली आहे.
खर्च आम्हीच करू म्हणून मुलाचे पालक मुलीसाठी वनवन भटकत आहेत. निसर्गाच्या अवकृपेने व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे प्रत्येक पित्याला वाटते की, आपली मुलगी चांगल्या घरी नांदावी, अशी आशा असते सध्याला ग्रामीण भागातील मुलीच्या पित्याची नजर शहरी भागातील मुलाकडे वळली आहे. श्रीमंत असो की, गरीब असो शेतकरी मुलाला मुलगी देण्यास मुलीचे पिता नकार देत आहेत. त्यामुळे प्रेमप्रकरणात वाढ होत आहे.
पवनी तालुक्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या विवाह इच्छूक मुलांना मुलगी मिळणे कठीण झाले आहे. पुर्वी मुलाचे लग्न लाखो रूपयाची उधळण करून मोठ्या थाटामाटात करीत होते. मात्र आता वाढत्या शेतीच्या कर्जामुळे अल्प खर्चातचच लग्न साध्या पद्धतीने केल्या जात आहे. मुलगी मिळणे कठीण झाल्यामुळे बऱ्याच मुलांनी हुंडा दिल्याचे समजत आहे. मुलगी दाखवून व लग्न जोडून देणाºयांना सुगीचे दिवस आले आहेत.

शेतकरी नवरा नको, पण शेती हवीच
च्शेतकरी मुलांना कोणीही मुलगी देण्यास तयार नाहीत. सर्वात प्रथम सरकारी नौकरीवर असलेल्या मुलांना प्राधान्य दिल्या जात आहे. परंतू काही ठिकाणी सध्याला नौकरी सोबत शेती आहे का? असाही प्रश्न पुढे येत आहेत. शेतकरी नवरा नको पण शेती हवीच, असा प्रश्न पुढे येत आहे.

मुलीच्या शोधात वाढतेय वय
च्पालोरा परिसरातील अनेक तरूण युवक लग्न करण्याकरिता पुढे आले असता मुलगी मिळत नसल्यामुळे त्यांची वय ३५ ते ४० वर्ष झाली आहे. काही मुलांनी तर तुम्हाला पैसे पाहिजेत असतील आम्ही द्यायला तयार आहोत. लग्नाचा संपूर्ण खर्चही आम्हीच करू फक्त मुलगी द्या, असाही निर्णय घेतानी दिसत आहेत. ही परिस्थिती पालोरा परिसरातच नाही तर तालुक्यात पाहायला मिळत आहे.

Web Title: Do not get a bride for farmers' children; Reality in Bhandara District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.