बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 09:38 PM2018-11-28T21:38:01+5:302018-11-28T21:38:20+5:30

गोवर-रुबेला लसीकरणाबाबत मनात शंका ठेवू नका. ही लस पोलीओ सारखीच असून या लसीमुळे कोणताही अपाय होत नाही. रुबेलाची लक्षणे गोवर पेक्षा वेगळे आहे. बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे फार महाग पडते. मुलामुलींच्या आरोग्याची काळजी पालकांनी घ्यावी.

Do not ignore the health of children | बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

Next
ठळक मुद्देरवींद्र जगताप : महर्षी विद्या मंदिर शाळेतून गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोवर-रुबेला लसीकरणाबाबत मनात शंका ठेवू नका. ही लस पोलीओ सारखीच असून या लसीमुळे कोणताही अपाय होत नाही. रुबेलाची लक्षणे गोवर पेक्षा वेगळे आहे. बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे फार महाग पडते. मुलामुलींच्या आरोग्याची काळजी पालकांनी घ्यावी. शासनाने आपल्यासाठी गोवर-रुबेला ही लस मोफत उपलब्ध करुन दिली आहे. या मोहिमेचा सर्व पालकांनी लाभ घेवून ही मोहिम १०० टक्के यशस्वी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी केले.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग, भंडाराद्वारे गोवर आणि रुबेला पासून बालकांचे रक्षण करणाऱ्या गोवर रुबेला (एमआर) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ बुधवारला फुलमोगरा स्थित महर्षी विद्या मंदिर शाळेत करण्यात आला. त्यावेळी सोईओ जगताप बोलत होते. यावेळी जि.प.चे आरोग्य सभापती प्रेमदास वनवे, मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उईके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधूरी थोरात, आयएमएचे डॉ. अशोक मेश्राम, शाळेच्या प्राचार्य श्रृती ओहळे, जि.प. सदस्य चंद्रशेखर दुरूगकर, फुलमोगरा येथील सरपंच, डॉ.भोंगाडे, डॉ. कुंभरे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोवर - रुबेला लसीकरणाबाबत बालकांना प्रमाणपत्र देण्यात आले. डॉ. मेश्राम यांनी रुबेला-गोवर लसीकरण मोहिमेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, या मोहिमेचा उद्देश मुलांना गोवर-रुबेला पासून संरक्षण देण्यासाठी आहे. गोवरचे दुरीकरण आणि रुबेलाचे नियंत्रण करण्यासाठी ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना एमआरची लस टोचणे अत्यावश्यक आहे. या लसीमुळे कोणताही परिणाम होत नाही. अपवादात्मक दुखणे किंवा ताप येवू शकतो. मुलांना काही त्रास झाल्यास लगेच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. गोवर-रुबेलाच्या लढाई असून आपण योध्दा आहोत, असे त्यांनी सांगितले. गोवर आणि रुबेलाचा संसर्ग होवू नये म्हणून बालकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे, गोवरमुळे होणाºया मृत्युचे प्रमाण आणि जन्मजात रुबेला पिडित संभाव्य रुग्ण कमी करणे व जास्तीत जास्त बालकांना लसीकरण करुन १०० टक्के उद्दिष्ट गाठणे हे यामोहिमेचे लक्ष आहे. सर्व शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, सर्व शासकीय रुग्णालय, अंगणवाडी केंद्र व मदरसा येथे ही लस देण्यात येत आहे. बालकांना ही लस प्रशिक्षित आरोग्य कर्मचाºयांकडून टोचली जाणार आहे, असेही ते म्हणाले.
प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थीनींनी समुह गान सादर म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. या शाळेतील जवळपास २३०० विद्यार्थ्यांना सदर लस देण्यात आली. कार्यक्रमासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांसह शाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थींनी व पालकांनी सहकार्य केले.

Web Title: Do not ignore the health of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.