सणासुदीच्या काळात ग्रामीण भागातील पथदिव्यांची वीज खंडित करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:15 AM2021-09-02T05:15:19+5:302021-09-02T05:15:19+5:30
भंडारा : वीज देयकाचा भरणा न केल्याने भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांतील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. सद्या ...
भंडारा : वीज देयकाचा भरणा न केल्याने भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांतील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. सद्या पावसाळ्याचे दिवस असून ग्रामीण भागात सण साजरे होत आहेत. अशातच विद्युत विभाग वीज खंडित करीत असल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या भावना लक्षात घेता विद्युत विभागाने पथदिव्यांची वीज खंडित करू नये, अशी मागणी विद्युत विभागाचे मुख्य अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे.
आधीच ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी असते. त्यातच सर्व प्रकारच्या मूलभूत सोयी-सुविधा ग्रामपंचायतीला स्वत:च्या उत्पन्नातून कराव्या लागतात. त्यामुळे ग्रामपंचायत स्वत:च्या उत्पन्नातून वीज बिल भरू शकत नाही. शासनाने १५ व्या वित्त आयोगातून वीज बिल भरण्यास सांगितले आहे. परंतु, त्यामधून गावातील इतर सोयी-सुविधा पूर्ण कराव्या लागत असल्याने वीज बिल भरणे शक्य नसल्याचे सरपंचांच्या संघटनेने आ. परिणय फुके यांना दिलेल्या निवेदनातून अवगत करून दिले.
त्यामुळे आमदार परिणय फुके यांनी पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने व सणासुदीचे दिवस असल्याने पथदिव्यांची वीज खंडित करू नये, असे मुख्य अभियंता यांना दिलेल्या पत्रातून मागणी केली आहे. विद्युत पुरवठा खंडित करण्याचा प्रकार असाच सुरू राहिल्यास प्रसंगी आपण सरपंच संघटनांसोबत रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवू, असे कळविले आहे.