तुम्ही एकटे समजू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत

By admin | Published: November 27, 2015 12:49 AM2015-11-27T00:49:48+5:302015-11-27T00:49:48+5:30

नक्षलवाद देशाला घातक आहे. आपल्यातलेच आपले बहिण-भाऊ नक्षल चळवळीत सामील होत आहेत.

Do not you think alone, we are with you | तुम्ही एकटे समजू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत

तुम्ही एकटे समजू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत

Next

महानिरीक्षक कदम यांचे आवाहन : पालांदुरात श्रद्धांजली कार्यक्रमात शहीद जवानांच्या कुटुंबाचा सत्कार
पालांदूर : नक्षलवाद देशाला घातक आहे. आपल्यातलेच आपले बहिण-भाऊ नक्षल चळवळीत सामील होत आहेत. नक्षल्यांना लोकशाही मान्य नाही. गेली ३० वर्षे आम्ही त्यांच्याशी लढतो आहोत. कित्येक जवान शहीद झाले. त्यांची आठवण आपल्याला ठेवायची गरज आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी एकटे समजू नये. संपूर्ण पोलीस दल तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम यांनी दिला.
खासदार नाना पटोले मित्र परिवाराच्यावतीने पालांदूर येथे आयोजित २६/११ च्या शहीद जवानांना श्रध्दांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आमदार बाळा काशिवार, जिल्हाधिकारी धीरजकुमार, प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद पटोले, जि.प. सदस्य वर्षा हुमणे, उपसभापती विजय कापसे, सरपंच शुभांगी मदनकर, सरपंच वैशाली खंडाईत, वंदना गवळे, दामाजी खंडाईत, वसंत शेळके, हेमराज कापसे, कृष्णा जांभूळकर, कृष्णा धकाते, मोरेश्वर खंडाईत, सुदाम खंडाईत उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, देशाच्या संरक्षणाकरिता शहीद झालेल्या वीरपुत्रांचे बलिदान व्यर्थ जावू देऊ नका, प्रत्येकांनी प्रामाणिकपणे देशसेवा, मातृसेवा घडविण्याची ईच्छा बाळगावी, हा देश माझा आणि या मी देशाचा हे लक्षात ठेऊन एकनिष्ठेने समाजात आपुलकीने जगा. जगाच्या इतिहासात डॉ.बाबासाहेबांनी दिलेले संविधान आदर्श आहे. त्याचा सन्मान करण्याची जबाबदारी प्रत्येकांची आहे. २६/११ ची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सजग राहण्याची गरज आहे.
यावेळी देशाकरिता प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद ईशांत भुरे यांचे वडील रामरतन भुरे यांचा शहीद सदाशिव शेळके यांची पत्नी शारदा शेळके यांचा शहीद अंबेराज बिसेन एकोडी यांची पत्नी अंजली बिसेन यांचा शहीद रविंद्रकुमार जंवजाळ यांची पत्नी योगीता जंवजाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांना हुंदके आवरता येत नव्हते. यावेळी देशभक्तीपर गीताने अख्खा परिसर भावूक झाला होता. तत्पूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस विभागाने मानवंदना दिली. यावेळी खराशी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीत सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.
प्रास्ताविकात भरत खंडाईत म्हणाले, राजकारणात राहून समाजसेवा घडावी, हुतात्म्याचे स्मरण करावे, देशप्रेमाची जाणीव व्हावी आणि गावाची आदर्शाकडे वाटचाल व्हावी या हेतूने हा कार्यक्रम मागील आठ वर्षांपासून आयोजित करीत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे बहारदार संचालन मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांनी केले. आभारप्रदर्शन न्यायाहारवाणीचे सरपंच रत्नाकर नागलवाडे यांनी केले.
या कार्यक्रमाला खासदार नाना पटोले मित्र परिवार आणि पालांदूर जिल्हा परिषद क्षेत्र आणि गावातील बहुसंख्य तरुणांनी सहकार्य केले.
(वार्ताहर)

चिमुकलीने दिली संविधानाची शपथ
संविधान दिनाच्यानिमित्त जिल्हा परिषद अंगणवाडीची तीन वर्षे वयाची चिमुकली मृणाली चंद्रभान झलके हिने उपस्थितांना संविधानाची शपथ देताना सर्वांनी टाळ्यांचा जयघोष करीत तिचे कौतुक केले.
५१ तरुणांनी केले रक्तदान
देशाप्रती आपुलकीची भावना तेवत राहावी या उद्देशाने आयोजित रक्तदान शिबिरात ५१ तरुणांनी रक्तदान करुन शहीदांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. या सर्व तरुणांचे आयोजकांसह अतिथींनी अभिनंदन केले. पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम, जिल्हाधिकारी धीरजकुमार, आमदार बाळा काशीवार, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद पटोले यांचे कुंकुम तिलकने सरंपच वैशाली खंडाईत यांनी स्वागत केले.

Web Title: Do not you think alone, we are with you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.