दररोज घरच्या घरी करा सहा मिनिटे वॉक टेस्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:36 AM2021-04-20T04:36:50+5:302021-04-20T04:36:50+5:30
कोरोना संसर्गाची सर्वांमध्येच धास्ती पसरली असून प्रत्येक जण विविध उपाय करताना दिसत आहेत. कोरोना झालेल्या रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी ...
कोरोना संसर्गाची सर्वांमध्येच धास्ती पसरली असून प्रत्येक जण विविध उपाय करताना दिसत आहेत. कोरोना झालेल्या रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी होते. आपले फुफ्फुस व्यवस्थित आहे काय, याची आता घरच्या घरीच चाचणी करणे शक्य आहे. सिक्स मिनीट वॉक टेस्ट केल्यास नागरिकांना रक्तातील लपलेली कमतरता लक्षात येते. जेणे करून गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होते. यासाठी आता प्रत्येकाने पुढाकार घेऊन कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जागरूक नागरिक म्हणून पुढे येणे गरजेचे आहे.
बॉक्स
कोणी करायची ही टेस्ट
सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनाची लक्षणे असतील तर...
गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी दररोज ही चाचणी करावी यामुळे आपली ऑक्सिजन पातळी समजून येते.
बॉक्स
अशी करा चाचणी
आपल्या बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावर दिसणाऱ्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीची नोंद करावी. नंतर पल्स ऑक्सिमीटर बोटाला तसाच ठेवून घरातल्या घरात घड्याळ लावून सहा मिनिटे स्थिर गतीने वॉक करावा. नंतर पुन्हा ऑक्सिमीटरमधील नोंद घ्यावी.
बॉक्स
...तर घ्या काळजी
सहा मिनिटे चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९३ पेक्षा कमी झाली तर... चालणे सुरू करण्यापूर्वीच्या पातळीपेक्षा चालणे झाल्यानंतर ही पातळी तीनपेक्षा अधिकने कमी झाली तर... चालल्यानंतर धाप येणे, दम लागल्यासारखे होत असेल तर तातडीने डॉक्टरांना दाखवावे, ऑक्सिजन अपुरा पडतो असे समजावे.
कोट
शरीरात ९५ ते १०० पर्यंत ऑक्सिजनचे प्रमाण असते. सहा मिनिटे वॉक टेस्ट केल्यानंतर नियमानुसार शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ९२ च्या खाली आल्यास डॉक्टरांचा सल्ला व तपासणी करून घ्यावी. टेस्ट करताना कोणताही मानसिक तणाव नसावा.
- डॉ. मनोज चव्हाण, हृदयरोगतज्ज्ञ, भंडारा.