थोर महात्म्यांचा आदर्श ठेवून समाजकार्य करा

By admin | Published: February 15, 2017 12:30 AM2017-02-15T00:30:38+5:302017-02-15T00:30:38+5:30

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हे ध्येय ठेवून प्रत्येक भारतीयांनी जात, धर्म न पाहता परकीय सत्तेशी एकदिलाने लढा दिला आणि स्वराज्य मिळविणे...

Do social work by keeping the great masters ideal | थोर महात्म्यांचा आदर्श ठेवून समाजकार्य करा

थोर महात्म्यांचा आदर्श ठेवून समाजकार्य करा

Next

पालोरा येथे जनजागृती कार्यक्रम : तोमेश्वर पंचभाई यांचे प्रतिपादन
चिचाळ : ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हे ध्येय ठेवून प्रत्येक भारतीयांनी जात, धर्म न पाहता परकीय सत्तेशी एकदिलाने लढा दिला आणि स्वराज्य मिळविणे या स्वराज्याचे सुराज्य करण्याचा संकल्प प्रत्येक युवकांनी सोडला पाहिजे. आपल्या स्वातंत्र्यात लढा देणाऱ्या अनेक जाती, धर्म, पंथीयांनी एकत्र येवून दिलेल्या थोर महात्म्यांची प्रत्येक समाज बांधवांनी जाण ठेवण्याचे आवाहन पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी केले. पालोरा चौ. येथील विदर्भ ग्रामीण पत्रकार संघातर्फे आयोजित जनजागृती मेळाव्यात ते बोलत होते.
पवनी तालुक्यातील पालोरा चौ. येथे विदर्भ ग्रामीण पत्रकार संघ पवनी तालुक्याच्या वतीने सर्वधर्मियांचा जनजागृती मेळावा आयोजित केला होता. अध्यक्षस्भानी पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई, प्रमुख अतिथी प्रबुद्ध विद्यालय कन्हाळगाव संचालक अरविंद धारगावे, भाजपा युवक मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मुनिर शेख, माजी सरपंच पालोरा दिलीप धारगावे, माजी नगराध्यक्ष भाष्कर रणदिवे जि.प. सदस्या मनोरमा जांभुळे, जि.प. माजी अध्यक्षा किसनबाई भानारकर, डॉ. राजेश गोंडाणे, उपसरपंच बाम्हणी द्रोपत धारगावे, संदीप मांढरे, माजी सभापती शिवशंकर मुंगाटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतीबा फुले, महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. तोमेश्वर पंचभाई पुढे म्हणाले उत्कृष्ट देशप्रेम, नि:स्वार्थी वृत्ती सुहदयता ही भारती यांची वैशिष्ट्ये आज लोप पावली आहेत. त्यामुळे सर्व क्षेत्रात सर्व पातळ्यावर भ्रष्टाचार फोफावल आहे.
भ्रष्टाचार हा मानवी समाजाला झालेला महारोग आहे. भारतीयांचे नैतिक अध पतन सहन न होणाऱ्या युवकांनी आता संघटितपणे प्रयत्न करून समाजातील अपप्रवृत्तीचा बिमोड केला पाहिजे.
मानव धर्माचा स्विकार करून जाती, पंथ, धर्म व त्यातून उद्भवणारे संघर्ष गाडून टाकले पाहिजे, असे म्हणाले. अरविंद धारगावे यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकूण बाबा साहेबांनी सांगितलेल्या शिका संघटीत व्हा व संघर्ष करा या उक्तीचा संदेश सांगून घटनेत दिलेला अधिकार कुणी देण्यास इन्कार करित असेल तर तो अधिकार घेण्यास मागे येवू नका वेळ प्रसंगाने संघर्ष करा तरच तुमचा हक्क तुम्हाला मिळेल, असे ते आपल्या भाषणात म्हणाले तर भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मुनिर शेख यांनी महानत्यागी बाबा जुमदेव यांनी १९४९ ला मानव धर्माची स्थापना करून चार तत्व, तीन शब्द व पाच नियमाची शिकवण देवून अंधश्रद्धेत ग्रासलेल्या मद्य प्राशन करणाऱ्या अनेक कुटूंबांना मानव धर्माच्या शिकवणीने कुटूंब उध्वस्त होण्यापासून सुखी केले त्या मानव धर्माचा जनतेनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पाहुण्यांचे हस्ते राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचे शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. यामध्ये जगदीश लक्ष्मण उपतळे, गणेश पुरूषोत्तम ब्राम्हणकर, प्रकाश किसन हातेल, संध्या वासनिक, रविंद्र भोयर, अरविंद धारगावे, चंद्रशेखर कठाणे, शिशुपाल रामटेके, द्रोपद धारगावे, निशाद लांजेवार, विक्की पचारे, मोहन हरडे आदींना गौरविण्यात आले. संचालन मनोहर मेश्राम प्रास्ताविक निश्चित मेश्राम व आभार विक्की पचारे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Do social work by keeping the great masters ideal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.