चायनिज खाताय की पोटाच्या आजारांना निमंत्रण देताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:39 AM2021-09-22T04:39:10+5:302021-09-22T04:39:10+5:30

भंडारा : अजिनोमोटो म्हणजेच मोनोसोडियम ग्लुटामेंट हे तुम्हाला काही फळामधून सुद्धा मिळते. जसे टाेमॅटो, पनीर, मशरूम जर तुम्हाला मोनोसोडियम ...

Do you eat Chinese or invite stomach ailments? | चायनिज खाताय की पोटाच्या आजारांना निमंत्रण देताय?

चायनिज खाताय की पोटाच्या आजारांना निमंत्रण देताय?

Next

भंडारा : अजिनोमोटो म्हणजेच मोनोसोडियम ग्लुटामेंट हे तुम्हाला काही फळामधून सुद्धा मिळते. जसे टाेमॅटो, पनीर, मशरूम जर तुम्हाला मोनोसोडियम खायचेच आहे, तर ही फळं खा यामधूनही तुम्हाला मोनोसोडियम मिळेल. अजिनोमोटोचा स्वाद हा मीठासारखा लागतो. यामुळे ज्यांना बीपीचा त्रास आहे. त्यांनी याचा उपयोग करू नये. अजिनोमोटोचा जास्त प्रमाणात वापर हा आपल्या डोळ्यांसाठी घातक ठरू शकतो. पॅकफूडमध्ये अजिनोमोटोचा वापर असतो. यामुळे तुम्ही खूप जाड होऊ शकता. अजिनोमोटोला लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक मानले जाते. लहान मुले, हृदयविकार असणाऱ्यांनी अजिनोमोटो खाणे टाळावे. ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे, सतत डोकं दुखत राहत, त्यांनी अजिनोमोटोचा वापर करू नये. हे सर्व केमिकलपासून तयार केले जाते. अजिनोमोटो मोनोसोडियम ग्लूटामेट, ग्लूटामेट एसिडच्या मिश्रण वाळवून याची पावडर तयार केली जाते. अजिनोमोटो हे एक प्रकारचे मीठ असून हे आधी चीनमध्ये वापरले जायचे. पण आता आपल्याकडेही याचा वापर पॅकफूडमध्ये मोठ्या प्रमाणात केला जात आहे. नागरिकांनी काही चायनिज खाण्याआधी नागरिकांनी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

बॉक्स

काय आहे अजिनोमोटो ?

अजिनोमोटो हे एक प्रकारचं केमिकल आहे. याला एमएसजी असंही म्हटलं जातं. याचा अर्थ आहे मोनो सोडियम ग्लूमेट. हा प्रोटीनचा हिस्सा आहे. याला अमिनो ॲसिड्सही म्हटलं जातं. अजिनोमोटो याला सर्वात जास्त बनवतं. त्यामुळं याला याच नावानं ओळखलं जातं.

अजिनोमोटोचा उपयोग कुठे केला जातो? तर खास करून चायनिज जेवणात अजिनोमोटोचा वापर केला जातो. यामुळं चव वाढवली जाते.

जगभरात स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. चायनिज फूड, नूडल्स, सूप, बर्गर, पिज्जा, मॅगी मसाला यांच्यातही याचा वापर केला जातो.

बॉक्स

अजिनोमोटोच्या सेवनानं काय नुकसान होऊ शकतं ?

वांझपणा – गर्भवती महिलांनी याचं अतिसेवन केल्यास याच्या सेवनाचा थेट परिणाम न्युरोंसवर पडतो. यामुळं शरीरातील सोडियमचं प्रमाणही वाढून ब्लड प्रेशर वाढण्याचा धोकाही असतो. महिलांच्या वांझपणालाही हे कारणीभूत ठरू शकतं.

बॉक्स

मायग्रेन – अर्ध डोकं दुखणं म्हणजे मायग्रेन. अजिनोमोटोचं जास्त सेवन केल्यानं हा त्रास होऊ शकतो. आजही तरुण पिढीपैकी अनेकांना ही समस्या आहेच. त्यामुळं अजिनोमोटो युक्त खाद्य पदार्थ खाणं हे टाळायलाच हवे.

बॉक्स

लठ्ठपणा – आजकाल तरुण पिढीत जंकफूड जास्त प्रमाणात खाल्लं जात आहे. यात अजिनोमोटो जास्त प्रमाणात असतं. यामुळं शरीरात सोडियमचं प्रमाण वाढतं. याच्या सेवनामुळं वारंवार भूक लागते. यामुळं माणूस वारंवार काही ना काही खात राहतो. यामुळं लठ्ठपणाही वाढतो.

बॉक्स

अनिद्रा – अजिनोमोटो एक न्यूरोट्रान्समीटर आहे. जे मेंदूतील पेशी किंवा न्यूरॉंसला उत्तेजित करतं. यामुळं रात्रभर झोप लागत नाही. यामुळे दिवसा काम करताना झोप लागते. याशिवाय झोप न झाल्यानं वीकनेसपणा जाणवतो. यासोबतच श्वासासंबंधित रोग होण्याचाही धोका असतो.

बॉक्स

छातीत दुखणं – अजिनोमोटोच्या सेवनानं अचानक छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागतो. यामुळं धडधडदेखील वाढते. हृदयाच्या स्नायूंमध्ये तणावदेखील जाणवतो.

बॉक्स

म्हणून चायनिज टाळा ..

लहान मुलांनाही याच्या सेवनापासून दूर ठेवायला हवं. जर एखाद्यानं याचं सेवन केलं आणि त्याला वरील लक्षणं जर जाणवली नाहीत याचं सेवन सुरक्षितही असू शकतं मात्र कालांतराने याचे आरोग्यावर दुष्परिणाम दिसू लागतात.

Web Title: Do you eat Chinese or invite stomach ailments?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.