शहरात पाणीपुरी खाताय की टायफाईडला निमंत्रण देताय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:39 AM2021-08-19T04:39:18+5:302021-08-19T04:39:18+5:30
भंडारा : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात टायफाईड हा आजार होतो. या आजाराचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होतो. अस्वच्छ ...
भंडारा : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात टायफाईड हा आजार होतो. या आजाराचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होतो. अस्वच्छ वातावरणात एस. टायफी हा जीवाणू विकसित होतो आणि उघड्या अन्नाला किंवा पाण्याला तो दूषित करतो. दूषित अन्न पदार्थ खाल्यामुळे किंवा पाणी प्यायल्यामुळे जीवाणुचा प्रादुर्भाव होवून टायफाईडचे लागण होते. त्यामुळे पावसाच्या दिवसामध्ये उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. विशेषत: पाणीपुरी खाताना त्यात वापरणारे पाणी, स्वच्छता यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. टायफाईड हा आजार साल्मोनेला टायफिड या विषाणुपासून होतो. सदर जीवाणू (बॅक्टेरिया) टायफाईड झालेल्या रुग्णांच्या रक्तात आणि आतड्यांमध्ये असतो. डायफाईड तापाला विषमज्वर म्हणतात. स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे. जिल्हा आरोग्य विभागातर्फे स्वच्छता ठेवण्याचे तसेच पावसाळी आजारापासून बचावासाठी उपाय योजना सुचविल्या आहेत.
बॉक्स
जिल्हा फणफणतोय
गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना ताप, सर्दी, टोकेदुखीसारखे आजार होत आहे.
बॉक्स
आजाराची लक्षणे
ताप येतो तो कमी अधिक होतो. काहींना उलट्या किंवा जुलाबही होतात. पोट दुखणे, खोकला, अतिसार, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा येतो. अशक्तपणा वाढतो, भूक मंदावते आदी लक्षणे टायफाईड या आजारावर दिसत आहे. अशी लक्षणे दिसताच वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.
बॉक्स
टायफाईड होण्याची कारणे
पावसाळ्यात दूषित पाण्याच्या संपर्कातून टायफाईड आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते. मलमुत्राद्वारे दूषित पाण्यातून, माशा बसलेल्या अन्नातून, अस्वच्छ हातांद्वारे हे जीवाणू निरोगी व्यक्तीच्या तोंडातून शरीरात प्रवेश करतात. आतड्यात जावून त्या विषाणुंची संख्या वाढते. त्यानंतर जीवाणू आपला विषारी प्रभाव दाखवू शकतात.