आजाराला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या

By admin | Published: April 19, 2017 12:20 AM2017-04-19T00:20:29+5:302017-04-19T00:20:29+5:30

मागील काही दिवसांपासून पोटासंबंधीच्या आजाराने त्रस्त असलेल्या भंडारा शहरातील एका प्रख्यात चर्मविकार तज्ज्ञाने आत्महत्या केली.

Doctor Suicide | आजाराला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या

आजाराला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या

Next

भंडारा विद्यानगर येथील घटना : विष मिश्रित केलेले सलाईन घेतले
भंडारा : मागील काही दिवसांपासून पोटासंबंधीच्या आजाराने त्रस्त असलेल्या भंडारा शहरातील एका प्रख्यात चर्मविकार तज्ज्ञाने आत्महत्या केली. ही घटना आज मंगळवारी सकाळी विद्यानगर कॉलनीतील त्यांच्या राहत्या घरी उघडकीस आली. या घटनेमुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
प्रितीश अरविंद भोयर (३०) असे मृतक डॉक्टरचे नाव आहे. सोमवारला रात्री भोजन केल्यानंतर त्यांनी राहत्या घरी विष मिश्रित केलेले सलाईन स्वत:ला टोचून घेतले होते. आज मंगळवारला सकाळी प्रितीशचे वडील अरविंद भोयर यांनी त्यांना उठविण्यासाठी आवाज दिला. मात्र आताून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी खोलीत जावून बघितले असता डॉ.प्रितीश हे निपचित पडून असल्याचे त्यांना आढळून आले. याप्रकरणी वडिलांनी भंडारा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना त्यांच्या खोलीतून सलाईनची रिकामी बॉटल, काही वस्तू व आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली. रात्रीला सलाईनमधून विष घेवून डॉ.प्रितीश यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून डॉ.प्रितीश यांना पोटाचा आजार होता. या आजारामुळे होणाऱ्या वेदना त्यांना असह्य होत नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज वडिलांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. एमबीबीएस, एमडी असे उच्च विद्याविभुषित असलेले डॉ.प्रितीश हे शहरात चर्मविकार तज्ज्ञ म्हणून प्रख्यात होते.
मागील दोन वर्षांपासून लायब्ररी चौकात त्यांचे खाजगी रूग्णालय होते. २०१३ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या इंटरनॅशनल काँग्रेस आॅफ डर्मेटोलॉजी तथा आईएडीव्हीएल कॉन्फरन्स डरमेकल २०१४ चे त्यांनी प्रतिधिनीत्व केले होते. जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनानंतर व्हिसेरा उच्चस्तरीय परिक्षणासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी सांगितले. हा अहवाल आल्यानंतर डॉ.प्रितिश यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Doctor Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.