वयाच्या चाळिशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:39 AM2021-08-19T04:39:10+5:302021-08-19T04:39:10+5:30

भंडारा : वयाची चाळीशी गाठलेल्यांना वाहन परवाना काढण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. पुर्वी ...

Doctor's certificate required to get a driving license after the age of forty | वयाच्या चाळिशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र

वयाच्या चाळिशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र

Next

भंडारा : वयाची चाळीशी गाठलेल्यांना वाहन परवाना काढण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. पुर्वी हे प्रमाणपत्र ऑफलाईन सादर करायचे होते. मात्र आता ऑनलाईन सादर करावे लागणार आहे. वयाच्या चाळीशी नंतर शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेल्यांनाच ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार आहे.

वाहन चालक हा वैद्यकीय व शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल तरच तो व्यवस्थित चालवू शकतो. त्यामुळे वयाची चाळीशी ओलांडणाऱ्यांना एमबीबीएस डॉक्टरांकडून ऑफलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागत होते. आता लायसन्स काढण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरू केली. या अंतर्गत घरबसलया लर्निंग लायसन्स काढणे सोयीचे झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

बॉक्स

लनिंग लायसन्स ऑनलाईन

वाहन परवान्यासाठी नागरिकांना आरटीओ कार्यालयाच्या अनेकदा फेऱ्या माराव्या लागतात. त्यातच दलालाकडून अतिरिक्त पैसे आकारल्या जात असल्याची ओरड नेहमीच होत असते. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरू केली. या अंतर्गत भंडारा जिल्ह्यात ऑनलाईन लर्निंग लायसन्स काढण्यात आले आहे.

बॉकस

किती वयापर्यंत मिळते लायसन्स

वाहन चालवायचा परवाना घेण्यासाठी चालकांचे वय किमान १६ असणे गरजेचे आहे.

कोणत्याही वयापर्यंत चालकाला लायसन्स काढता येते किंवा नूतनीकरण करता येते. पंरतु वयाच्या चाळीसी नंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रमाणपत्र गरजेचे असते. अन्यथा लायसन्स काढताही येत नाही. किंवा नूतनीकरण करता येत नाही.

बॉक्स

एका डॉक्टरला दिवसाला २० प्रमाणपत्र देता येणार

पुर्वी आयुर्वेदिक किंवा होमियोपॅथिक डॉक्टरही प्रमाणपत्र द्यायचे. परंतु यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर केवळ एमबीबीएस असलेल्या डॉक्टरांचेच प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते.

एक डॉक्टर दिवसातून केवळ २० जणांना परवान्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची मुभा दिला आहे. आता ऑनलाईन प्रमाणपत्र अपलोड करावे लागणार आहे.

यापुर्वी आरटी कार्यालयाच्या आवारात एक डॉक्टर राहायचे. लायसन्स धारकांना कुठलीही सहनिशा न करता प्रमाणपत्र दिले जात होते.

कोट

पुर्वीपासून चाळीसीनंतर परवाना काढायचा असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक होते. परंतु आता ते ऑनलाईन मागविण्यात येणार आहे. त्यासाठी लॉगीन देण्यात येणार आहे. त्यानंतर अपलोड करावे लागणार आहे. ही प्रक्रिया अंडरप्रोसेस आहे.

- राजेंद्र वर्मा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, भंडारा

Web Title: Doctor's certificate required to get a driving license after the age of forty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.