कोरोना काळात घटले डाॅक्टरांचे वजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:35 AM2021-05-26T04:35:35+5:302021-05-26T04:35:35+5:30
भंडारा जिल्हा रुग्णालय हे ग्रामीण नागरिकांसाठी आरोग्याच्या बाबतीत संजीवनीचे काम करते यातच कोराेना काळात डॉक्टर्स अधिपरिचारिका आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका ...
भंडारा जिल्हा रुग्णालय हे ग्रामीण नागरिकांसाठी आरोग्याच्या बाबतीत संजीवनीचे काम करते यातच कोराेना काळात डॉक्टर्स अधिपरिचारिका आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. तासन्तास ड्युटी व त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम जाणवत आहे त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शरीर स्वास्थ्यावर ही फरक पडल्याचे जाणवत आहे. तरीही डॉक्टर्स स्वत: ‘फिट’ ठेवत आहेत.
आहाराची घेतात काळजी
केव्हा कुठली इमर्जन्सी येईल याची शाश्वती नसते. धावपळीमुळे कधी जेवण तर कधी नाश्त्याला सुद्धा वेळ मिळत नाही. अशा प्रसंगी आहाराबाबत आपण स्वतः काळजी घेत असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात.
विविध बैठका, यासह रुग्णांची तपासणी करण्याची ही जबाबदारी डॉक्टरांच्या खांद्यावर असते त्यामुळेच नियमित आहार व व्यायाम डॉक्टर करीत असल्याचे सांगत डॉक्टरांनी सांगितले. याशिवाय आराेग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांच्याही आराेग्याबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. काैटुंबिक जबाबदारी त्यांनाही पार पाडावी लागते. कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने प्रत्येकालाच त्यांच्या आराेग्याची चिंता सतावत असते.
धावपळीतही सर्वांचीच घेताहेत काळजी
जिल्हा रुग्णालय म्हटले की जबाबदारीचे ओझे स्वतःहून वाढत असते. विविध विभागात काम करीत असताना कामाचे ओझे वाढते ते मात्र या धावपळीत ही अनेकांची काळजी घ्यावीच लागते. येणारे फोन कॉल्स व प्रशासनिक कामाचा बोजा ही सहन करावा लागतो.
वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका तथा अन्य आराेग्य कर्मचाऱ्यांनी काेराेना याेद्धा म्हणून आपली भूमिका वेळाेवेळी सिद्ध केली आहे. अति तणावात काम करुन ही कधीकधी रुग्णांच्या राेषाला ही सामाेरे जावे लागते. परंतु रुग्णांची काळजी हेच प्रथम कर्तव्य समजले जाते.
जिल्हा रुग्णालयाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे त्यातच कोरोना महामारीने अधिकच व्याप्ती वाढली दैनंदिन कामाव्यतिरिक्त स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी आहार व नियमित व्यायाम मी करीत असतो त्यामुळे मनही प्रसन्न राहते. मानसिक तणाव येऊ नये यासाठी विविध मार्ग अवलंबिले जाऊ शकतात. आराेग्य क्षेत्रात काम करीत असताना विविध अनुभव कामी येतात. अशा स्थितीत स्वत:च्या आराेग्याबाबत हलगर्जीपणा करु नये, असे मला वाटते.
- डॉ. पियूष जक्कल
जिल्हा शल्य चिकित्सक
गत वर्षभरापासून कोराेना महामारीने आम्हालाही त्रस्त केले आहे मात्र आम्ही कधीही डगमगलो नाही स्वतःची काळजी घेऊन इतरांना सेवा देण्याचे कार्य आम्ही करत आहोत आहाराबाबत काळजी घेत असतो. सातत्याने कामाचा बाेजा डाेक्यावर असला तरी शरीर स्वास्थ्यावर त्याचा परिणाम हाेऊ शकताे. मी स्वत: काेराेना काय असताे हे अनुभवले आहे. त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर ही हाेऊ शकताे. म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. निखिल डोकरीमारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा
आरोग्य म्हटलं की विविध आजारांचा समावेश असतो या जारांशी लढता लढता डॉक्टर ही आजारी पडू शकतात म्हणून आम्ही स्वतः स्वतःची काळजी घेत असतो खानपान याव्यतिरिक्त योगा प्राणायामचे धडेही आम्ही रोज गिरवितो. आपण स्वत: साेबतच इतरांच्या ही आराेग्याची काळजी घेतलीच पाहिजे. काेराेना काळात अनेकांनी आपल्या स्वकीयांना गमावले आहे. त्यामुळे विपरित परिस्थितीतही आराेग्याची काळजी घ्यायला हवी.
- डॉ. अमित कावळे, बाल रोग तज्ज्ञ भंडारा