तलाठ्यांकडून मिळणारे दाखले बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:20 PM2017-09-13T23:20:23+5:302017-09-13T23:20:53+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळापासून तलाठ्यांमार्फत विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र देण्याचे काम केले जात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून तलाठ्यांमार्फत विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र देण्याचे काम केले जात होते. पण ते निराधार असून नियमबाह्य असल्याने २ आॅक्टोबर म्हणजे गांधी जयंतीपासून देणे बंद करण्याचा निर्णय विदर्भ पटवारी संघ यांनी घेतला असून त्याबाब त्यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन दिले आहे.
तलाठी हा शेतकरी व प्रशासनाचा दुआ आहे. कित्येक शासकीय कामाकरिता तलाठ्यांच्या दाखल्याची गरज भासते. त्याशिवाय पुढचे कामच होत नव्हते. तलाठीसुद्धा स्थानिक माहितीच्या आधारावर परंपरागत पद्धतीने सुमारे १२ ते १५ प्रकारचे दाखले देत होते. मात्र याला कोणताही आधार नसल्याने ते नियमबाह्य ठरवल्या गेल्याने तलाठी अडचणीत येत आहेत. त्यामुळे आता हे परंपरागत दाखल मिळणार नाही.
दाखल्यांवर आता करडी नजर
वारसान प्रमाणपत्र, दाखला, मालकी हक्क, हैशीयत प्रमाणपत्र, एकत्रीकरण किंवा विभक्त कुटूंबाचे प्रमाणपत्र, चतु:सिमा प्रमाणपत्र, विद्युत जोडणी नाहरकत प्रमाणपत्र, विहिर-बोअरवेल असल्याचा नसल्याचा दाखला, अस्वच्छ व्यवसाय करत असल्याचा, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र, ओलीताचे किंवा कोरडवाहूचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, रिकामा खाली, प्लॉटबाबतच्या दाखल्यांचा समावेश आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून तलाठ्यामार्फत १२ ते १५ प्रकारचे दाखले वितरीत केले जात होते. मात्र त्यांना कोणताही कायदेशीर आधार नाही. त्यामुळे तलाठी व शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सातही तालुक्यातील तलाठी संवर्गाकडून अशी ही गैरकायदेशीर दाखले २ आॅक्टोबर २०१७ पासून देणे बंद होत आहे.
-जीवन मेश्राम, जिल्हा सचिव, विदर्भ पटवारी संघ शाखा भंडारा