डोंगरी बु. ते गोबरवाही रस्त्याच्या रुंदीकरणासह तातडीने दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:23 AM2021-02-22T04:23:34+5:302021-02-22T04:23:34+5:30
जांब (लोहारा ) : तुमसर तालुक्यातील डोंगरी बु. हे मॅग्नीज खनिजासाठी प्रसिद्ध असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची ...
जांब (लोहारा ) : तुमसर तालुक्यातील डोंगरी बु. हे मॅग्नीज खनिजासाठी प्रसिद्ध असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची ये - जा व नागरिकांची वर्दळ असते. हा रस्ता ठिकठिकाणी उखडला असून, रस्त्यावर फार खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने डोंगरी बु. ते गोबरवाही या रस्त्याच्या रुंदीकरणासह दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संदीप ताले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे . डोंगरी बु. हे परिसरातील मोठे गाव असून, येथे मॉईन असल्यामुळे नागरिकांना रोजगारासह , बँकेत व विविध प्रकारच्या कामासाठी या
परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना आपल्या दैनंदिन व विविध कामासाठी डोंगरी बु. गोबरवाही या रस्त्याने जावे लागते. मात्र, हा रस्ता अरुंद असून पूर्ण उखडल्याने धोकादायक झाला आहे. येथे अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्याने नागरिकांनी याचा धसला घेतला आहे . डोंगरी बु. गोबरबाही रस्ता हा अरुंद व उखडल्याने अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. याकडे बाधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे . डोंगरी बु. येथे मॉइन असल्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात मालवाहू वाहनांची वाहतूक या मार्गाने सुरू असते. त्यामुळे मॉइन प्रशासनाने सीएसआर योजनेअंतर्गत सदर रस्त्याचे रुंदीकरणासह मजबूत बाधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचीही गरज आहे. मात्र, संबंधित विभागाने डोंगरी बु. गोबरवाही रस्त्याच्या रुंदीकरणासह दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संदीप ताले यांनी प्रशासनाला केली आहे.