अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नकाे; वृत्तपत्र ही पूर्णपणे सुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:44 AM2021-04-30T04:44:22+5:302021-04-30T04:44:22+5:30

अचूक माहितीसाठी वृत्तपत्र सगळ्यांनी वाचणे आवश्यक आहे. समाजात आजही वृत्तपत्र हे विश्वासार्ह माध्यम आहे. वृत्तपत्रामुळे कोरोना होतो ही बाब ...

Don't believe the rumors; The newspaper is completely safe | अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नकाे; वृत्तपत्र ही पूर्णपणे सुरक्षितच

अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नकाे; वृत्तपत्र ही पूर्णपणे सुरक्षितच

Next

अचूक माहितीसाठी वृत्तपत्र सगळ्यांनी वाचणे आवश्यक आहे. समाजात आजही वृत्तपत्र हे विश्वासार्ह माध्यम आहे. वृत्तपत्रामुळे कोरोना होतो ही बाब अद्याप पुढे आलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेने वृत्तपत्रांमुळे कोरोना होत नसल्याचे या आधीच स्पष्ट केले आहे. नियमित घरी वृत्तपत्र बोलावून बिनधास्तपणे वाचन करावे.

- केशर बोकडे,

मुख्याध्यापक, शास्त्री विद्यालय, भंडारा

मनात कसलाही संकोच व भीती न बाळगता प्रत्येकाने वृत्तपत्र वाचावे. वृत्तपत्र छापताना त्यांचे सॅनिटायझेशन व निर्जंतुकीकरण केले जाते. वृत्तपत्रांपासून कोरोना होत नाही. वर्तमानपत्रामुळे कोरोना होतो हा केवळ भ्रम आहे. वृत्तपत्रामुळे कोरोना होतो, असे एकही उदाहरण मला तरी ऐकिवात नाही.

- अवीकुमार उजवणे,

युवा उद्योजक, साकोली

वृत्तपत्रांच्या छपाईदरम्यान त्यावर सॅनिटायझेशन केले जाते. वृत्तपत्र विक्रेतेदेखील सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करतात. त्यामुळे त्यांच्यापासूनसुद्धा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाही. वृत्तपत्रांमुळे कोरोना झाला असता तर वृत्तपत्र बंद ठेवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले असते.

- मनोज दलाल,

वरिष्ठ नागरिक, भंडारा

सोशल मीडियामुळे अफवांचा बाजार सुरू झाला. अजूनही वाचकांचा १०० टक्के विश्वास वृत्तपत्रांमुळे टिकून आहे. अचूक व सविस्तर बातम्या ह्या वृत्तपत्रातून वाचायला मिळतात. जागृतीचे माध्यम असलेल्या वृत्तपत्रांची अफवांमुळे वृत्तपत्र बंद केली. जागतिक आरोग्य संस्थेनेही वृत्तपत्रामुळे कोरोना होत नाही, हे स्पष्ट केले आहे.

- डॉ. नरेंद्र कुंभरे,

जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा

वृत्तपत्रांमुळे कोरोना होत नाही तर फिजिकल डिस्टन्स न ठेवल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होतो. छापून बाहेर पडणारे वृत्तपत्र सॅनिटाइझ करूनच येतात. कोरोना काळातही सेवा देणारे वृत्तपत्र अत्यावश्यक सेवेत मोडले. जग आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची अचूक माहिती वर्तमानपत्रे देतात.

- विनोद भुरे,

सामाजिक कार्यकर्ता, भंडारा

Web Title: Don't believe the rumors; The newspaper is completely safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.