‘बर्ड फ्लू’बाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:29 AM2021-01-15T04:29:37+5:302021-01-15T04:29:37+5:30
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. वासुदेव वंजारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरेश कापगते, जिल्हा ...
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. वासुदेव वंजारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरेश कापगते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके उपस्थित होते. बर्ड फ्लूच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यादृष्टीने जिल्हा प्रशासनाबरोबरच पशुसंवर्धन विभाग व आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे सांगून पालिकेने मदत कक्षामधून नागरिकांना योग्य ती माहिती द्यावी. जिल्ह्यात पक्षी स्थलांतरासाठी असणाऱ्या पाणथळाच्या जागांवर विशेष लक्ष द्यावे. एखादा पक्षी मृत आढळल्यास त्याद्वारे संसर्ग पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त डॉ. वंजारी यांनी बर्ड फ्लूच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.