तुमसरात ‘व्यर्थ न हो बलिदान’ रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:40 AM2021-08-17T04:40:59+5:302021-08-17T04:40:59+5:30
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या महान थोर पुरुषांनी स्वतंत्र लढ्यात बलिदान दिले. त्यांचा आठवणीना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या महान थोर पुरुषांनी स्वतंत्र लढ्यात बलिदान दिले. त्यांचा आठवणीना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वातंत्र्य लढ्यात तुमसर शहराचे फार मोठे योगदान आहे. १९४२ रोजी सहा लोकांना वीरमरण प्राप्त झाले होते, हा तुमसर शहराचा इतिहास आहे. तुमसरच्या व देशातील सर्व हुतात्माना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी तसेच स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी तुमसर शहरातून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन येथील मातोश्री पेट्रोल पंप ते पोलीस ठाणे समोरील हुतात्मा स्मारकपर्यंत काढण्यात आली. रॅली दरम्यान पावसाने हजेरी लावली. मात्र, काँग्रेसचे कार्यकर्ते कुठेही न डगमगता एक जुटीने तिरंगा रॅलीला यशस्वी केले.
यावेळी प्रदेश सचिव प्रमोद तितरमारे, माजी आमदार दिलीप बन्सोड, अरविंद कारेमोरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, तालुकाध्यक्ष शंकर राऊत, माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रदेश महिला काँग्रेसच्या महासचिव सीमा भुरे, रमेश पारधी, नारायणराव तितीरमारे, गुलराजमल कुंदवाणी, नगरसेवक अमरनाथ रगडे, बाळा ठाकूर, शुभम गभणे, कलाम शेख, सुरेश मेश्राम, नीरज गौर, काना बावनकर, शैलेश पडोळे, शिव बोरकर, आनंद बिसणे, प्रफुल्ल बिसणे, अमित लांजेवार, करुणा धुर्वे, सुरेखा सहारे, नूतन भोले, नलिनी डिंकवार, चंदन मसर्के, बालकदास ठवकर, अजय खंगार, प्रमोद कटरे, रामेश्वर मोटघरे, गणेश सोनुसार, नीलेश वासनिक, आलोक बनसोड, महेंद्र मेश्राम, विजय गिरेपुंजे, हसन रिजवी, दिलीप चोपकर, निशा गणवीर, सीमा बडवाईक, प्रेम राऊत, रवी सार्वे, नामदेव कांबळे, शरद रेहपाळे, प्रा. कमलाकर निखाडे, आणिक जमा, कैलास नागदेवे, आलोक बनसोड, मिलिंद गजभिये, निखिलेश गजभिये, कृष्णकांत बघेल, अजहर पाशा, अझर पाशा, अजीम खान, संजय मेश्राम, स्मिता बोरकर, हिरालाल नागपुरे, नंदलाल गुर्वे, एमडी आलम खान, सद्दाम शेख, गडीराम बांडेबुचे, रोहित बोंबडे, देवेंद्र मेश्राम, अंजली पारधी, सुनीता गभणे, निकिता डोके, उज्ज्वला टेंभेकर, जय डोंगरे, वसंत बितलाय, संतोष बघेले, विलास खरवडे, मुकुंदा आगाशे, विजय चौधरी, दिनेश रोकडे, कृष्णा बनकर, अजय गौरकर, शैलेश मरस्कोल्हे, अंकित रहांगडाले आदी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.