साकोलीत सर्व्हिस रस्त्याची नाली फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:40 AM2021-09-23T04:40:07+5:302021-09-23T04:40:07+5:30

नागपूर रोडकडे जाणारा सर्व्हिस रोड हा एकेरी असून जेएमसीनुसार चॅनेझ क्र. ४५ ४२० वर डावीकडे मुख्य नालीवरील ...

The drain of the service road in Sakoli burst | साकोलीत सर्व्हिस रस्त्याची नाली फुटली

साकोलीत सर्व्हिस रस्त्याची नाली फुटली

Next

नागपूर रोडकडे जाणारा सर्व्हिस रोड हा एकेरी असून जेएमसीनुसार चॅनेझ क्र. ४५ ४२० वर डावीकडे मुख्य नालीवरील पूर्ण काँक्रिट झाकण पाच महिन्यांपासून फुटल्याने येथे रात्रीच्या वेळी अनेक दुचाकीस्वार ट्रकच्या विरुद्ध दिशेत येणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशाने, रातांधळेपणाने बाजूला शोल्डररोड आहे असे समजून चक्क या नालीत पडतात. नालीत झाडेझुडपे वाढल्याने दिवसाही नालीवर झाकण आहे की नाही, असा भास होऊन चालत जाणारी जनताही या नालीचा शिकार झाली आहे. याबाबत येथील दुकानदारांनी जेएमसीला सांगितले असता, हे काम अशोका बिल्डकॉमवर ढकलले, तर अशोका बिल्डकॉम ही जबाबदारी जेएमसीवर ढकलते. या क्षतिग्रस्त व अपघातास आमंत्रण देणाऱ्या नालीवर त्वरित झाकण लावावे, अन्यथा येथे रात्रीबेरात्री अपघात होऊन कोणती जीवित हानी झाल्यास स्थानिक नगरपरिषद प्रशासन, जेएमसी व अशोका बिल्डकॉमला जबाबदार ठरविले जाईल, असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते समीर गहाणे, संजय वघारे, शिवसैनिक शैलेश गोबाडे, सोनू बैरागी यांनी दिला आहे.

Web Title: The drain of the service road in Sakoli burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.