उड्डाणपुलातून पाण्यासह राखेची गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:05 AM2018-08-22T01:05:27+5:302018-08-22T01:06:14+5:30
देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलातून राख व पाण्याची गळती सुरु आहे. पुलाच्या भरावात राखेचा वापर करण्यात आले आहे. दगडी पुलातून पाण्याची प्रचंड गळती सुरु असल्याने पुल बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सदोष बांधकाम की तांत्रिक त्रृट्यामुळे ही गळती सुरु आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलातून राख व पाण्याची गळती सुरु आहे. पुलाच्या भरावात राखेचा वापर करण्यात आले आहे. दगडी पुलातून पाण्याची प्रचंड गळती सुरु असल्याने पुल बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सदोष बांधकाम की तांत्रिक त्रृट्यामुळे ही गळती सुरु आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
देव्हाडी येथे तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होत असते. त्यासाठी येथे उड्डाणपुल प्रस्तावित आहे. सुमारे १८ ते २० कोटींचा पुल राज्य शासन तयार करीत आहे. जागतिक बँकेचे अर्थसहाय्य या पुलाला मिळाले आहे. नागपूर येथील मुख्यालयातून पुलावरून देखरेख व नियंत्रण ठेवले जात आहे. आता पावसात उड्डाणपुलातून पाणी गळती सुरु आहे. भरावात राखेचा वापर करण्यात आला आहे. पाण्यासह राख वाहून रस्त्यावर पसरली आहे. राख निसरडी आहे. वाळल्यावर हवेत प्रचंड धुळ पसरते. त्याचा मोठा त्रास येथे सहन करावा लागत आहे.
पुलाचे बांधकाम सिमेंट दगडांचे आहे. दगडात गॅप निर्माण झाली आहे. पुलाच्या भरावातून पाण्याची धार बाहेर निघत आहे. पाण्यामुळे पुल खचण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पुलावरील पाणी खाली येण्याकरिता विशेष तंत्राचा वापर करण्यात येतो. भरावातून पाणी रस्त्यावर येत असल्याने पुल बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पुल भरावातून राख बाहेर येत असल्याने पुलात पोकळी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही तांत्रिक बाब सर्वसामान्यांना कळत आहे. परंतु या विभागाचे अधिकारी मात्र याबाबत मौन पाळून असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पुलाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.