सहा महिन्यांपासून रस्त्यावरच ठेवले आहेत नालीचे कव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:29 AM2021-07-25T04:29:49+5:302021-07-25T04:29:49+5:30

शहरातील संत जगनाडे नगर, हसारा रोडवर नवीन वस्ती वसलेली आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांच्या सोयीकरिता कोट्यवधी रुपये खर्च करून ...

Drainage covers have been kept on the road for six months | सहा महिन्यांपासून रस्त्यावरच ठेवले आहेत नालीचे कव्हर

सहा महिन्यांपासून रस्त्यावरच ठेवले आहेत नालीचे कव्हर

Next

शहरातील संत जगनाडे नगर, हसारा रोडवर नवीन वस्ती वसलेली आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांच्या सोयीकरिता कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट रस्ता व नालीचे बांधकाम केले. रस्त्यालगत असलेल्या नालीवर सिमेंटचे कव्हर काही ठिकाणी बसविण्यात आले. परंतु काही ठिकाणी अजूनपर्यंत सिमेंटचे कव्हर बसविण्यात आले नाही. सदर सिमेंट कव्हर रस्त्यावरच पडून आहेत. त्यामुळे या सिमेंट कव्हरवरूनच ट्रॅक्टर व इतर वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे हे कव्हर तुटण्याची दाट शक्यता आहे. नालीवरील काही कव्हर न बसवल्याने येथील धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. नाली बंद असावी. नालीतील जंतू व सरपटणारे प्राण्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. अंधारात उघड्या असलेल्या नालीमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. तसेच रस्त्यावर असलेल्या सिमेंट कव्हरमुळेसुद्धा नागरिकांना येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना काळात काम बंद पडले होते. त्यामुळे नालीवरील कव्हर बसविण्यास विलंब लागला. परंतु आता सर्वसामान्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सदर कव्हर नालीवर बसविण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. ट्रॅक्टर व इतर वजनदार वाहनांच्या वाहतुकीमुळे सदर सिमेंटचे कव्हर तुटण्याची शक्यता असून पुन्हा नवीन कव्हर बनविण्याचा खर्च संबंधित यंत्रणेला करावा लागेल. त्यामुळे तत्काळ नालीवरील कव्हर बसवून येणारा खर्च टाळावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

Web Title: Drainage covers have been kept on the road for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.